शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

परभणी : पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:20 AM

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. मान्सूनपूर्व झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. मान्सूनपूर्व झालेल्या या पावसामुळे बळीराजाच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत.दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी पहाटे जिल्हाभरात पावसाला प्रारंभ झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील ओढे- नाले पहिल्यांदाच वाहू लागले आहेत. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस होता. जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. त्यात परभणी तालुक्यामध्ये ३०.२५ मि.मी., पालम २४, पूर्णा ८१, गंगाखेड ४८.७५, सोनपेठ ४३, सेलू ९, पाथरी २०, जिंतूर १६.५८ आणि मानवत तालुक्यात ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हाभरात सरासरी ३३.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली.दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असला तरी हा मान्सूनचा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी मान्सूनच्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.पूर्णा नदीच्या पातळीत अल्पशी वाढपूर्णा- पूर्णा तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. पूर्णा मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील बरमाल, माटेगाव, आहेरवाडी, चुडावा या भागातील ओढ्यांना पाणी आले होते. हे पाणी पूर्णा नदीपात्रात दाखल झाले असून यावर्षीच्या पावसाळ्यात पूर्णा नदी प्रथमच प्रवाही झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, पावसामुळे पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेत भर पडली.सोनपेठ ४३ मि.मी. पाऊससोनपेठ परिसरात ४३ मि.मी. पाऊस झाला आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत होता. आवलगाव मंडळात ४२ मि.मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत १९.६५ टक्के पाऊस झाला आहे.रस्ता झाला चिखलमयपालम तालुक्यातील जांभूळबेट हा रस्ता खराब झालेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून पाच गावांची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पालम ते जांभूळबेट हा ३ कि.मी. अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलामुळे वाहनधारकांना आपली वाहने रस्त्याच्या बाजुला लावून चक्क पायपीट करावी लागत आहे. याच रस्त्यावरुन सोमेश्वर, घोडा, आरखेड, सायळा, उमरथडी या गावांची वाहतूक होते. परंतु, रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. थोडाही पाऊस झाला तरी रस्त्याची दुरावस्था होत असल्याने पावसाळ्याचे चार महिने कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.पहिल्याच पावसात रस्त्याची दाणादाणचारठाणा- येथील महावीर चौक ते बसस्थानक या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली असून वाहतूक करताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. गावातील हा मुख्य रस्ता असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. थोड्या पावसातही गजमल किराणा ते देशमुख चौक दरम्यान रस्त्यावर मोठे पाणी साचते. त्यामुळे पायी चालणेही मुश्कील होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस