शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगाखेड बाजार समितीत सोयाबीनला सर्वोच्च भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:56 IST

अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील सोयाबीनला फटका बसला असला तरी पावसापासून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येऊ लागले असून गंगाखेड बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला सर्वोच्च म्हणजे ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील सोयाबीनला फटका बसला असला तरी पावसापासून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येऊ लागले असून गंगाखेड बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला सर्वोच्च म्हणजे ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.जिल्ह्यात यावर्षी खरीपात २ लाख ३४ हजार हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा झाला होता. परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामाच्या प्रारंभी ज्यांनी पेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांच्या हाती थोडेफार सोयाबीन आले. शिवाय अतिवृष्टीपासून बचावलेले; परंतु, काळवंडलेले सोयाबीनही काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे आले. हे सोयाबीन आता शेतकरी विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणत आहेत. शुक्रवारी परभणी बाजार समितीत ३७२ क्विंटल सोयाबीन आले. या सोयाबीनला कमीत कमी २ हजार ५०० ते जास्तीत जास्त ३ हजार ६५१ रुपये असा प्रति क्विंटल असा भाव मिळाला. गंगाखेड बाजार समितीत २२० क्विंटल सोयाबीन आले. येथे प्रति क्विंटलला कमीत कमी ३ हजार ७५० ते जास्तीत जास्त ३ हजार ९०० रुपये भाव मिळाला. सोनपेठ बाजार समितीत १३५ क्विंटल सोयाबीन दाखल झाले. येथे सोयाबीनला ३ हजार रुपये ते ३ हजार ६५२ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सेलू बाजार समितीत फक्त ८ क्विंटल सोयाबीन शुक्रवारी दाखल झाले. येथे सोयाबीनला ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.गुरुवारी बोरी बाजार समितीत ४१३ क्विंटल सोयाबीन दाखल झाले होते. येथे सोयाबीनला २ हजार ५०० ते २ हजार ९५० रुपये भाव मिळाला. पाथरीत ३०५ क्विंटल सोयाबीन दाखल झाले होते. येथे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १ हजार ९०० रुपये ते ३ हजार ६०४ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. ताडकळस मध्ये १ हजार ६७५ क्विंटल सोयाबीन बाजार समितीत आले. येथे सोयाबीनला २ हजार ८०० ते ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांनी त्यांच्या खरेदीची माहिती संबंधित विभागाच्या वेबसाईटवर अपडेट केली नाही. त्यामुळे या बाजार समित्यांमधील खरेदी- विक्रीची आकडेवारी कळू शकली नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती