शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दमदार पावसाने जिल्ह्यातील पिकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:17 IST

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ताण देण्यास सुुरुवात केली़ जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली़ कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली़ जिल्हाभरात पेरणीचे क्षेत्र १०० टक्क्यापर्यंत पोहचले नसले तरी ८४ ते ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाअभावी ही पिके कोमेजत असल्याची स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते़ गावोगावी पावसासाठी देवाला साकडेही घालण्यात आले होते़अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पावसाला सुरुवात झाली आहे़ शुक्रवारी जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला़ शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते़ परभणी शहर व परिसरात शनिवारी सूर्यदर्शन झाले नाही़ सकाळच्या सत्रात रिमझिम असणारा पाऊस दुपारी मात्र चांगलाच कोसळला़ दुपारी ३़३० वाजेपासून ते ५ वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़ अनेक दिवसानंतर रस्त्यावर पावसाचे पाणी वाहताना दिसून आले़ अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली़शहरासह गंगाखेड तालुक्यात ४़१५ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ पाथरी तालुक्यात दिवसभर रिमझिम सुरू होती़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास अर्धा तास मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ सोनपेठ, मानवत, पालम, पूर्णा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने या तालुक्यांमधील पिकांना जीवदान मिळाले आहे़ साधारणत: दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ते आजपर्यंत होणाºया अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५२ टक्के पाऊस झाला आहे़ आतापर्यंत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६३़९ टक्के तर मानवत तालुक्यात ६३़५ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी असून, आतापर्यंत सरासरी २१०़८२ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत़ त्यामुळे पाण्याची चिंता कायम आहे़पूर्णा तालुक्यात सर्वाधिक पाऊसशनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २९.८० मि.मी., सेलू तालुक्यात २८.२० मि.मी., पाथरी २३.३३ मि.मी., मानवत तालुक्यात २५.३३ मि.मी., जिंतूर तालुक्यात २१.१७ मि.मी., परभणी १९.८८ मि.मी., सोनपेठ : १२ मि.मी., पालम १०.६७ मि.मी. आणि गंगाखेड तालुक्यात केवळ ७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२ मि.मी. असून, आतापर्यंत सरासरीच्या २०.९ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी