शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी :मराठवाड्यासह विदर्भात जिंतुरातून गुटखा तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:15 IST

शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत.तालुक्यात राजरोसपणे गुटखा व्यवसाय होत असून, तो आता चांगलाच फोफावला आहे. जिंतूर शहरातील ५५ पानटपऱ्या, २०० किराणा दुकाने, २० हॉटेलवर बंदी असलेला गुटखा सर्रास मिळतो. विशेष म्हणजे, दामदुप्पट दराने हा गुटखा विक्री केला जातो. गुटखा विक्रेत्यांचे जाळे शहरापुरते मर्यादित राहिले नसून तालुक्यातील १७० गावांत गुटखा पोहचविला जातो. यासाठी स्वतंत्र वाहन वापरत असून जवळील खेड्यात मोटारसायकलवरून गुटखा पुुरविला जातो. विशेष म्हणजे, गुटख्याची वाहतूक रात्रीच्या वेळी केली जाते.गुटखा माफियांनी तालुक्यात बस्तान मांडले असून, जिंतूर व परिसरात तीन गोदाम बांधले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचा माल साठविला जातोे. जिंतूर येथून परभणी, जालना, हिंगोली, नांदेड व बीड या जिल्ह्यात गुटखा पुरवठा होतो. त्याचबरोबर विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची येथूनच वाहतूक केली जाते. अन्न व औषध विभाग, पोलीस प्रशासनासह राजकीय वरदहस्त असल्यानेच गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गुटखा विक्रीला पायबंद घालण्याची मागणी होत आहे.बनावट : गुटख्याचे वाढले प्रमाणजिंतुरातून पुरवठा होणारा ८० टक्के गुटखा हा बनावट असून तो जिंतूर व परिसरात असलेल्या फॅक्टरीतून आणला जातो. हा गुटखा आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. विशेष म्हणजे, यामध्ये लाकडी साल व केमीकल वापरले जाते. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शहातील विविध शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळ परिसरात राजरोसपणे गुटखा विक्री केला जात आहे. याचा परिणाम शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर होत आहे. गुटखा विक्री करणाºयांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी टाळत अन्न व औषध विभाग मागील अनेक दिवसांपासून मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करीत आहे. पोलीस प्रशासनही कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुटखा माफियांनी एक प्रकारे पाठबळच मिळत आहे.जिंतूर तालुक्यात चौका-चौकात खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. विशेष म्हणजे, छापिल किंमतीपेक्षा अधिक दराने गुटख्याची विक्री होत असताना कारवाई मात्र होत नाही.गुटखा विक्री करणाºयांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आमच्याकडे नाही. शिवाय परभणीसह इतर जिल्ह्यांचा अतिरिक्त कारभार असल्याने कारवाईलाही पुरेसा वेळ मिळत नाही. तरी पण गुटखामाफियांवर लवकरच कारवाई करू-सुनिल जयपूरकर,सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

टॅग्स :parabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ