शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकऱ्यांना ४६ कोटी ८५ लाखांची अनुदान भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:23 IST

मागील वर्षी बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना वितरित करावयाच्या नुकसान भरपाईचा रखडलेला तिसरा हप्ता प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाच्या खात्यावर जमा केली आहे़ दिवाळीपूर्वी बोंडअळीचे अनुदान प्राप्त झाल्याने बाधित शेतकºयांना ही दिवाळीची भेट ठरली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील वर्षी बोंडअळीने बाधित झालेल्या शेतकºयांना वितरित करावयाच्या नुकसान भरपाईचा रखडलेला तिसरा हप्ता प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाच्या खात्यावर जमा केली आहे़ दिवाळीपूर्वी बोंडअळीचे अनुदान प्राप्त झाल्याने बाधित शेतकºयांना ही दिवाळीची भेट ठरली आहे़परभणी जिल्ह्यामध्ये २०१६-१७ च्या खरीप हंगामात सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती़ कापूस बोंडे लागण्याच्या अवस्थेत असतानाच या पिकावर बोंडअळीचा हल्ला झाला़ पाहता-पाहता जिल्ह्यातील संपूर्ण कापूस बोंडअळीने बाधित झाले़ त्यामुळे शेतकºयांना कापसाच्या उत्पादनापासून वंचित रहावे लागले होते़ जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे केल्यानंतर राज्य शासनाकडे ३ लाख ५१ हजार शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची आवश्यकता असल्याची मागणी नोंदविली होती़ जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने कापूस उत्पादकांना ३ टप्प्यात नुकसानीचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला़ या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या व दुसºया टप्प्यात १०५ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी शेतकºयांना वितरित करण्यात आला़ मात्र तिसºया टप्प्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने शेतकरी अनुदानाच्या रकमेपासून वंचित होते़ जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्याचे अनुदान वितरित करण्यासाठी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार ७५२ रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदवूनही अनुदान मिळत नसल्याने तिसºया टप्प्यातील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित राहिले होते़ दोन महिन्यांपासून या अनुदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता़ शेतकºयांची ओरडही वाढली होती़ त्यातच पावसाने पाठ फिरविली़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने शेतकरी बोंडअळीच्या अनुदानावर भरोसा ठेवून होते़ दरम्यान, दिवाळीपूर्वीच हे अनुदान प्राप्त झाले असून, जिल्हा प्रशासनाने तहसीलनिहाय बोंडअळीच्या तिसºया हप्त्यापोटी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार ७५२ रुपये वितरित केले आहेत़ त्यामुळे या अनुदानावर शेतकºयांचा दिवाळी सण आनंदात जाईल, अशी अपेक्षा आहे़परभणी तालुक्याला : सर्वाधिक रक्कम४बोंडअळीच्या अनुदानापोटी परभणी तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे पैसे रखडले होते़ जिल्हा प्रशासनाने परभणी तहसीलसाठी ८ कोटी ६० लाख ८ हजार ८६ रुपये वितरित केले आहेत़ सेलू तालुक्यासाठी ८ कोटी २५ लाख १२ हजार ८२ रुपये, जिंतूर ८ कोटी ४ लाख २६ हजार ८२ रुपये, पाथरी ५ कोटी २८ लाख १० हजार २९३ रुपये, मानवत ६ कोटी ६६ लाख ४४ हजार २६० रुपये, सोनपेठ ३ कोटी ५३ लाख २ हजार ९०५ रुपये, पालम ३ कोटी ८० लाख ४९ हजार ७५ रुपये आणि पूर्णा तालुक्यासाठी २ कोटी ६८ लाख १६ हजार ९६९ रुपये वितरित करण्यात आले आहेत़गंगाखेड तालुक्यासाठी या निधीतून बोंडअळीचे अनुदान वितरित करण्यात आले नाही़ या तालुक्यामध्ये बाधित सर्व शेतकºयांना अनुदानाची रक्कम वितरित झाल्याने या निधीतून गंगाखेड तालुका वगळण्यात आला आहे़सव्वा लाख शेतकºयांना होणार फायदाजिल्ह्यात बोंडअळीच्या अनुदानासाठी तिसरा हप्ता रखडल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते़ ३ लाख ५१ हजार शेतकºयांना अनुदान वितरित करावयाचे असून, आतापर्यंतच्या दोन टप्प्यामध्ये २ लाख १६ हजार शेतकºयांच्या खात्यावर १०५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे़ तिसºया टप्प्यामध्ये १ लाख ३५ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित होते़ जिल्हा प्रशासनाने ४६ कोटी रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाकडे वितरित केल्याने या रकमेतून सव्वा लाख शेतकºयांच्या खात्यावर बोंडअळीच्या तिसºया टप्प्याचे अनुदान दिले जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस