शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:11 IST

आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्याशिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़या संदर्भात राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच एक आदेश काढण्यात आला आहे़ त्यात म्हटले आहे की, २०१७ व २०१८ या वर्षामध्ये राज्यातील ८ हजार ५०० शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत़ काही शिक्षकांनी त्यांच्या इच्छेनुसार बदली होवूनही कौटुंबिक अडचणी तसेच जोडीदाराची त्यांच्यासोबत बदली न झाल्याने व अन्य कारणामुळे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये संबंधितांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे, त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश संबंधित सीईओंनी काढावेत, संबंधितांना कार्यमुक्त केले असल्यास व त्यांना बदली नको असल्यास त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जायचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे आवश्यक आहे़ संबंधित शिक्षकाने आंतर जिल्हा बदली रद्द केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्यांना आंतर जिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही, या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवा ज्येष्ठता बाधित होणार नाही, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकTransferबदलीzpजिल्हा परिषद