शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

परभणी: जिंतूर येथील गोदामात धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:06 IST

जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत.उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ३१ जानेवारी रोजी जिंतूर येथील शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली होती. रॅडम पद्धतीने तांदळाचे १५ आणि गव्हाणे २० पोते तपासण्यात आले. यामध्ये प्रति क्विंटल १६२० ग्रॅम तांदुळ आणि ११३० ग्रॅम गहू कमी भरला. तपासणीच्या वेळी या गोदामात २६६६ क्विंटल तांदुळ आणि ४३०९ क्विंटल गहू होता. त्यात १ लाख ४२ हजार ९६९ रुपये किंमतीचे ४३ क्विंटल तांदुळ आणि १ लाख २१ हजार ५३५ रुपयांचे ४९ क्विंटल गहू कमी असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानंतर २९ मार्च रोजी जिंतूर गोदामातील २ लाख ६४ हजार ५१४ रुपयांच्या अपहाराची प्रत्येकी ८८ हजार १७१ रुपये वसुली तहसीलदार सुरेश शेजूळ, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रामदास बोटे व गोदामपाल सोमनाथ काळे यांच्याकडून करण्याचे आदेश दिले आहेत. या गोदामाबरोबरच पारधी यांनी बोरी येथील शासकीय गोदामाचीही तपासणी केली होती. त्या ठिकणाी प्रति क्विंटल ११६० ग्रॅम तांदुळ आणि १२०० ग्रॅम गहू कमी भरला. तपासणीच्या वेळी गोदामात ८०१ क्विंटल तांदुळ आणि २ हजार ९७८ क्विंटल गहू उपलब्ध होते. त्यात ९ क्विंटल २९ किलो तांदुळ आणि ४७ क्विंटल ७४ किलो गहू कमी भरल्याचे निष्पन्न झाले.१ लाख ४७ हजार ५६० रुपये एवढी या धान्याची किंमत होते. दोन्ही गोदामात मिळून ४ लाख १२ हजार २२१ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून तहसीलदार सुरेश शेजूळ , नायब तहसीलदार रामदास बोटे व गोदामपाल सोमनाथ काळे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख ३७ हजार ४०७ रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.केवळ रक्कम वसुलीचीच कारवाई४जिंतूर येथील शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी गोदामाची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मात्र या प्रकरणी गैरप्रकार करणाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ आर्थिक वसुली करुन संबंधितांना क्लीनचीट देण्याचा प्रशासनाचा निर्णय अफरातफर करणाºयांसाठी सोयीचा ठरत आहे. यापूर्वीही शासकीय गोदामात अनेक घोटाळे झाले; परंतु, प्रशासनाने गैरव्यवहार करणाºयांनाच पाठिशी घातल्याने घोटाळेबाज पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदारcollectorजिल्हाधिकारी