- लक्ष्मण कच्छवेदैठणा (जि.परभणी) : परभणीहून गावाकडे परत येत असताना चारचाकी वाहनाच्या धडकेत खासगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व शिस्तप्रिय शिक्षक ज्ञानोबा सोपानराव कच्छवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान परभणी-गंगाखेड महामार्गावर तरोडा परिसरात घडली. यामुळे दैठणा गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक ज्ञानोबा कच्छवे हे काही कामानिमित्त मंगळवारी स्वतःच्या दुचाकी (एमएच २२ एके ७०५०) वर सायंकाळी साडेसहा वाजता दैठणा येथून परभणीला गेले होते. तेथील काम आटोपून पुस्तके घेऊन रात्री ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान परत परभणी येथून दैठणा गावाकडे येत होते. दरम्यान, परभणी-गंगाखेड महामार्गावर तरोडा परिसरात एका बोलेरो वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच दैठणा येथील काही युवकांनी तातडीने त्यांना खासगी वाहनाने परभणीला उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मयत शिक्षक ज्ञानोबा कच्छवे यांच्या पश्चात पाच भाऊ, पुतणे-पुतण्या, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा मोठा परिवार आहे. ज्ञानोबा कच्छवे हे शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी गावात अनेक विद्यार्थ्यांना घडवले असून सध्या देखील ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : Teacher Dnyanoba Kachchwe died in an accident near Parbhani while returning from buying books. A car struck his bike. He was known for discipline and love for students. The village mourns.
Web Summary : शिक्षक ज्ञानोबा कछवे की परभणी के पास किताबें खरीदकर लौटते समय दुर्घटना में मौत हो गई। एक कार ने उनकी बाइक को टक्कर मार दी। वह अनुशासन और छात्रों के प्रति प्रेम के लिए जाने जाते थे। गांव में शोक।