शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळूसाठी जिंतूर तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:41 IST

वाळूधक्के बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिंतूर येथे दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : वाळूधक्के बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिंतूर येथे दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.शहरातील बांधकाम मजूर, गुत्तेदार, सेंट्रींग मजूर, मिस्त्री यांच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील परिसरात आयोजित सभेत जमीयतचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती कलीम बेग यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तालुक्यातील बोटावर मोजता येतील, असे दोन-चार जण महसूल व पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तामुळे मध्यरात्रीच्या सुमारास नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा करून ती चढ्याने दराने विक्री करीत आहेत. बांधकाम व्यवसाय एक ते दीड वर्षापासून ठप्प झाला आहे. त्यामुळे मजूर, गुत्तेदार व या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मजुरांच्या सहनशिलतेचा अंत पाहता त्वरित वाळू धक्के सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर अ.रशीद, खालेद गुत्तेदार, शब्बीर गुत्तेदार, बाबूराज आदींची भाषणे झाली.त्यानंतर नायब तहसीलदार गावंडे यांनी मोर्चास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनात नगरसेवक कपील फारोखी, शाहेद बेग मिर्झा, शेख इस्माईल, अहेमद बागवान, फेरोज खॉ पठाण यांच्यासह मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूagitationआंदोलन