शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळू चोरी करताना चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:08 IST

इसाद येथील मासोळी नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्यानंतर शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): इसाद येथील मासोळी नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्यानंतर शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त केली.गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या मासोळी नदीपात्रातील ठोकरवाळू आणण्यासाठी १२ जानेवारी रोजी दुपारी २ ते अडीच वाजेच्या सुमारास शहरातील काही ट्रॅक्टरचालक गेले होते. वाळू काढत असताना या भागातील शेतकरी भागवत साहेबराव सातपुते यांनी वाळू उपस्याची परवानगी विचारली. वाळू उपस्याने शेत जमीन घासून नुकसान होत असल्याचे सांगत उपसा करण्यास मज्जाव केला. त्यावरुन ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांत वाद झाला. हे प्रकरण हातघाईवर आले आणि ट्रॅक्टर चालकाने दगडाने शेतकºयाला मारहाण केली.या मारहाणीत भागवत साहेबराव सातपुते तसेच ट्रॅक्टर चालकासोबत आलेले नगरसेवक नागनाथ कासले आणि गणेश केरबा सातपुते हे तिघे जखमी झाले आहेत.या ठिकाणी होत असलेला गोंधळ पाहून आजूबाजूचे शेतकरी, इसाद येथील ग्रामस्थ नदीपात्र परिसरात जमा झाले. शेतकरी व ग्रामस्थांनी चार ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन अडवून ठेवत पोलीस, महसूल प्रशासनाला माहिती दिली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, जमादार रतन सावंत, टी.टी. शिंदे, राजू ननावरे, सुग्रीव सावंत, आनंद डोंगरे, योगेश सूर्यवंशी, अव्वल कारकून दत्तराव बिलापटे, तलाठी अक्षय नेमाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.चार ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन जप्त करुन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूPoliceपोलिसriverनदी