शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जवळा येथील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:53 IST

युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी समोर आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी समोर आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़तालुक्यातील जवळा झुटा येथील दिगंबर लिंबाजी नाईकनवरे (१९) याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला़ जायकवाडीच्या कालव्यात दिगंबर नाईकनवरे याचा मृतदेह आढळला होता़ या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला़ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणात तपास सुरू केला़ मिळालेल्या माहितीनुसार चौघांनी दिगंबरचा खून केल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी या प्रकरणात अंगद आश्रोबा झुटे याला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून तर शेख कदीर शेख इस्माईल, लक्ष्मण बाबासाहेब झुटे आणि गणेश सोपानराव सुरवसे यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे विचारपूस केली असता, चौघांनी मिळून कट रचून हा खून केल्याचे स्पष्ट झाले़ अनैतिक संबंधाच्या कारणावरून दिगंबर यास मारण्याचा कट रचला होता़ त्यानुसार अंगद झुटे, शेख कदीर शेख इस्माईल आणि लक्ष्मण बाबासाहेब झुटे यांनी त्यास जिवे मारले़ तर गणेश सोपानराव सुरवसे हा कट रचण्यात मुख्य आरोपी असून, त्याने दिगंबर यास मारण्यासाठी बाहेरून मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे़ पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, स्थागुशाचे प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक सोनवणे, सुग्रीव केंद्रे, जमीर फारुखी, किशोर चव्हाण, माने, काळे, मोहिते यांनी ही कामगिरी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrimeगुन्हाMurderखून