शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : अखेर गाढवांचा केला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:20 IST

वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.गंगाखेड शहराजवळून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून विना परवाना वाळुचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २६ गाढवांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. यावेळी गाढवांचे मालक मात्र फरार झाले. त्यामुळे या सर्व गाढवांना धारखेड ग्रामपंचायतीच्या आवारात बांधून ठेवण्यात आले. यातील एक गाढव कारवाईच्या दिवशीच दगावले. गाढवांना पकडून दहा दिवसांंचा काळ उलटला तरी या गाढवांवर मालकी हक्क दाखविणारे गाढवांचे मालक अथवा इतर कोणीही समोर आले नाही. शेवटी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, लिपिक सुरेश डिलोड, सरपंच यशोदा चोरघडे, ग्रामसेवक ज्ञानोबा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाढवांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात आठ जणांनी सहभाग घेतला. मात्र प्रति गाढव ५०० रुपये या प्रमाणे केवळ तिघांनीच पैसे भरल्याने उर्वरित पाच जणांना बोली लावता आली नाही. महसूल प्रशासन पकडलेल्या गाढवांचे मालक समोर आले असते तर त्यांना समज देऊन, दंड आकारून वाळू तस्करीला आळा घालता आला असता; परंतु, गाढवांचे मालक समोर आले नाहीत. त्यामुळे वाळू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर करणारे कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.७६ हजार रुपयांचा मिळाला महसूलमहसूल प्रशासनाने या गाढवांचा लिलाव करण्याचे ठरविल्यानंतर प्रति गाढव ३ हजार रुपये या प्रमाणे शासकीय बोलीवर ५० रुपये बोली लावून सय्यद वसीम सय्यद दिलावर यांनी १५ हजार २५० रुपयांचे १५ गाढवं खरेदी केले. बाळासाहेब केरबा भालके यांनी शासकीय बोलीवर १० रुपये वाढ करून ३ हजार १० रुपयाप्रमाणे १५ हजार ५० रुपयांची पाच गाढवे खरेदी केली.सय्यद आसेफ सय्यद अकबर यांनी ३ हजार ५० रुपया प्रमाणे ४५ हजार ७५० रुपयांची १५ गाढवं खरेदी केली. वाळू तस्करीतून मिळालेल्या २५ गाढवांच्या लिलावातून तहसील प्रशासनाला ७५ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावेळी सखाराम चोरघडे, शेख युनूस, दिगंबर चोरघडे, सुदाम टोलमारे, नंदकुमार भालके, भास्कर बोबडे, सय्यद युनूस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गंगाखेड तालुक्यात वाळूची वाहतूक करणाºया गाढवांचा लिलाव करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात वाळू वाहतूक करायला लावणारे मालक मात्र सापडले नाहीत. त्यामुळे यापुढेही गाढवांच्या साह्याने वाळूची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाढवांच्या मालकांना शोधण्याचे प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू