शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भर रस्त्यावरुन पळविले पन्नास हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:05 IST

बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे.येथील व्यापारी सय्यद जैनू सय्यद युसूफ यांनी सोमवारी सकाळी स्टेट बँक आॅफ इंडिया येथील खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. हे पैसे एका थैलीत टाकून ते सायकलवरुन घरी जात असताना डॉ.हेडगेवार चौक परिसरात चोरट्यांनी सायकलला अडकविलेली थैली हिसका देऊन पळविली. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच सय्यद जैनू यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचीच उलट तपासणी केली. बँकेतून खरेच पैसे काढले का, असे विचारत पैसे काढण्यासाठी भरुन दिलेली पावती बँकेतून आणण्याचे सांगितले व पावती मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करु, असे सांगून साधा तक्रार अर्ज लिहून घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नाही.तक्रार नोंदविण्यातच पोलिसांची धन्यताशहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी होणाºया चोºयांबरोबरच भर दिवसाही लुटमारीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन मात्र गुन्हे नोंदविण्याऐवजी केवळ तक्रार घेऊन तक्रारकर्त्याची बोळवण करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावत आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायाधीशांच्या निवासस्थानासह पाच घरे फोडल्याची घटना घडली होती. तर यापूर्वी देखील शहरात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.सोमवारी एका व्यापाºयाचे ५० हजार रुपये पळविल्याची घटना घडल्यानंतरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. यापर्वूी ८ फेब्रुवारी रोजी भंडारी कॉलनीतील उमदाबी शेख करीम यांच्या अंगावर घाण पडल्याचे सांगून त्यांच्याकडील ३० हजार रुपये पळविल्याची घटना घडली होती. चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैदही झाला होता. परंतु, पोलिसांनी त्यावेळेसही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.मोबाईल चोरीचे प्रकारगंगाखेड शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक बाजाराच्या दिवशी मोबाईलच्या चोरी होत आहेत. या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ तक्रार अर्जच घेतले जातात. त्यामुळे चोरीच्या तपासाकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसtheftचोरीMONEYपैसा