शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मासोळी प्रकल्पाने गाठली पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:21 IST

तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.गंगाखेड तालुक्यात असलेल्या डोंगर भागातील ४०० एकर जमिनीवर १९७२ सालच्या दुष्काळात उभारण्यात आलेला मासोळी प्रकल्प गेल्या चार वर्षात अत्यल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे कोरडाच राहिला होता.गतवर्षी १७ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पात केवळ ९ टक्केच एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. डिसेंबर २०१८ च्या अखेरीस हा प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या मृतसाठ्यातील पाण्यावरच गंगाखेड शहर व परिसरातील गावांची तहान भागविण्यात आली. चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात व सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी तालुका व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे तसेच अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या सरीमुुळे मासोळी प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मासोळी प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.मासोळी प्रकल्पाने पन्नाशी ओलांडल्याने परिसरातील माखणी, खोकलेवाडी, सुप्पा, इसाद, सिरसम आदी गावांसह गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्याच बरोबर मासोळी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचा सिंचनासाठी मोठा फायदा होणार असल्याने परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत. आगामी काळात डोंगर भागातील कोद्री, बडवणी, डोंगरजवळा, पिंपळदरी, सुप्पा आदी भागात दमदार पाऊस झाल्यास मासोळी प्रकल्प १०० टक्के भरेल, असा आशावाद मासोळी प्रकल्पात कार्यरत अधिकारी व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.२०१६ मध्ये भरभरून वाहिला प्रकल्पच्२०१७- १८ मध्ये पावसाने उघडीप दिल्याने मासोळी प्रकल्पात पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ पासून या प्रकल्पात केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. २०१७ पेक्षाही भयावह परिस्थिती २०१८ मध्ये तालुक्यात निर्माण झाली. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१८ मध्ये प्रकल्पाच्या पाण्यात घट होऊन केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. २०१८ च्या डिसेंबर अखेरीस मासोळी प्रकल्पाने तळ गाठत हा प्रकल्प मृतसाठ्यात गेला.च्उपलब्ध असलेल्या मृतसाठ्यातील पाण्यावरच तालुक्यातील काही गावांची व गंगाखेड शहराची आॅगस्ट महिन्यापर्यंत तहान भागविण्यात आली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सुरू झालेल्या पावसामुळे आज रोजी या प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा झाल्याने शेतकरी व आणि नागरिंकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान चार वर्षांच्या कालावधीत २०१६ मध्येच हा मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पdroughtदुष्काळWaterपाणी