शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:56 AM

राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाकडे बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन पीक लागले आहे. त्याची काढणीही झाली आहे. सोयाबीनचा शेतमाल बाजारपेठेत येत आहे; परंतु, राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्र अद्यापही सुरु केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकराही बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे आवश्यक असताना व्यापारी मात्र कवडीमोल दराने शेतकºयांचा माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिकांवर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्याने ज्या शेतकºयांना एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीनचा उतारा यायचा त्या शेतकºयांना आता एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीनवरच समाधान मानावे लागत आहे.त्यामुळे सध्या शेतकºयांची पुढे आड मागे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.प्रति क्विंटल २ हजारांचा बसला फटका४यावर्षीच्या खरीप हंगामातील मुगाला केंद्र शासनाने ६ हजार ९७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. त्यामुळे ज्या शेतकºयांनी मुगाचे उत्पन्न घेतले. त्या शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु, नाफेडने जिल्ह्यात कोठेही हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे ज्या शेतकºयांना पैशाची निकड होती, त्या शेतकºयांनी बाजार समितीतील व्यापाºयांना आपल्या शेतमालाची विक्री केली. व्यापाºयांनीही शेतकºयांच्या अडचणींचा फायदा घेत ४००० ते ४५०० रुपयांनीच मुगाची खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना प्रति क्विंटल २ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी