शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:37 IST

शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्ज वाटप सुरु करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी परभणी, सेलू, पाथरी व मानवत या चार तालुक्यांमध्ये घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी मागण्यांच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाºयांना धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्ज वाटप सुरु करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी परभणी, सेलू, पाथरी व मानवत या चार तालुक्यांमध्ये घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी मागण्यांच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाºयांना धारेवर धरले.सोयाबीन उत्पादक शेतकºयांना पीक विम्यातून हेक्टरी ४२ हजार रुपये देण्यात यावेत, ऊस उत्पादक शेतकºयांना एफआरपी प्रमाणे उसाला दर देऊन थकित देणे तत्काळ द्यावे, साखर आयात बंद करुन निर्यातीला १०० टक्के अनुदान द्यावे, ऊस गाळपाचे नियोजन करावे, दुधाला ६० रुपये प्रमाणे दर देऊन टोनच्या नावाखाली ग्राहकांची होणारी लूट थांबवावी, संपूर्ण शेतकºयांना कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेती मालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहित धरुन हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने १ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.विलास बाबर यांनी केले. आंदोलनात कॉ.अशोक कांबळे, कॉ.विष्णू मोगले, कॉ.सुभाष दिनकर, कॉ.शेख अब्दुल, कॉ.राजेभाऊ राठोड, कॉ.अशोक साखरे, कॉ.ज्ञानेश्वर गिरी, कॉ. अश्रोबा मोगले, कॉ.बाळासाहेब जमरे, कॉ.गंगाधर गवळे, कॉ.ज्ञानोबा हिंगे, कॉ.उद्धव ढगे, कॉ.उत्तम धुमाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मानवत येथे विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयात किसान सभा व सुकाणू समितीच्या संयुक्त विद्यमाने घेराव आंदोलन करण्यात आले. शहरातील संत सावता माळी रस्त्यावर असलेल्या माकपच्या संपर्क कार्यालयाजवळ शेतकरी सुकाणू समिती आणि किसान सभेचे पदाधिकारी एकत्र आले होते. हे पदाधिकारी या ठिकाणाहून गाजतवाजत मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयाजवळ पोहचले. आंदोलनस्थळी झालेल्या सभेत माकपचे तालुका सरचिटणीस लिंबाजी कचरे, सुकाणू समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आळणे, डॉ.जगदीश शिंदे, बाबासाहेब आवचार, अशोक बुरखुंडे, रामप्रसाद कचरे यांची भाषणे झाली. त्यानंतर तहसीलदार नकुल वाघुंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रामराजे महाडिक, नारायण आवचार, उद्धव काळे, मतीन अन्सारी, देविदास शिंदे, राजेभाऊ काकडे, विष्णू जाधव, मधुकर आवचार, गणेश शिंदे, वसंत शिंदे, रमेश साठे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, प्रविण दिनकर यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.पाथरी येथील तहसील कार्यालयात किसान सभेच्या वतीने तीन तास घेराव आंदोलन करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजही काहीवेळ ठप्प झाले होते. पाथरी येथे अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर जमा झाले. त्यानंतर त्यांनी सेलू कॉर्नरपर्यंत रॅली काढली. येथून ते परत तहसील कार्यालयासमोर आले. येथे त्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर जवळपास तीन तास त्यांनी हे आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार देविदास शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.दीपक लिपणे, बाळासाहेब गिराम, बळीराम वºहाडे, गोकुळ शिंदे, भागवत कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष नखाते, रत्नाकर शिंदे, भारत गायकवाड आदींची उपस्थिती होती.सेलू- येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सेलू येथे कॉ.रामेश्वर पौळ, दत्तूसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर जमले. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर धरणे आंदोलन करुन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात रंगनाथ ताठे, उद्धव पौळ, दगडोबा जोगदंड, मंगलबाई डुकरे, पांडुरंग बोचरे, आबासाहेब आवटे, रोहिदास हातकडके, नारायण पवार, विष्णू चव्हाण, केशव शिंदे, गोविंद पौळ, कारभारी पाते आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीStrikeसंप