शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

परभणी : घरकुल बांधकामांवर २९ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:49 PM

रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत.मागासवर्गीय प्रवर्गातील गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने नागरी आणि ग्रामीण भागामध्ये रमाई आवास योजना राबविली जाते. २०१० पासून या योजनेचे काम जिल्ह्यात सुरु झाले असून त्या अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज मागविणे, या अर्जांना मंजुरी देणे आणि प्रत्यक्षात घरकुल बांधकाम पूर्ण करुन देणे अशी प्रक्रिया राबविली जाते. घरकुलांसाठी राज्य शासनाकडून अनुदानही दिले जाते. २०१०-११ ते २०१८-१९ या ८ वर्षांमध्ये परभणी जिल्ह्यातील ७ नगरपालिकांना ३ हजार ८२ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८७८ घरकुले बांधून पूर्ण झाली असून ९५० घरकुलांचे बांधकाम सद्यस्थितीला प्रगतीपथावर आहे. या घरकुलांसाठी लाभार्थ्यांना अनुदान म्हणून नगरपालिका प्रशासनाला एकूण ३६ कोटी २८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा निधी घरकुल बांधकामावर खर्च झाला असून अजून ६ कोटी १७ लाख ४६ हजार रुपये शिल्लक आहेत.मानवत नगरपालिकेअंतर्गत ४३९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ११७ घरकुले पूर्ण झाली आहेत. जिंतूर पालिकेत २५० पैकी ७९, पूर्णा पालिकेत ८७७ पैकी ११०, सोनपेठ २४३ पैकी १२२, पाथरी ४२३ पैकी १११, सेलू ३९३ पैकी १३९ आणि गंगाखेड नगरपालिकेमध्ये ४५७ पैकी २०० घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.नागरी भागामध्ये घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली असतानाही घरकुल बांधकामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जाते; परंतु, प्रत्यक्षात मागील दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यामध्ये वाळूचे भाव गगनाला भिडल आहेत. अनेक भागात वाळू उपलब्ध होत नाही. त्याचाही परिणाम घरकुल बांधकामावर झाला आहे.आठ वर्षातील उद्दिष्टाच्या तुलनेत २८.४८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गोरगरीब लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेला नगरपालिका प्रशासनाने गती देऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे.९५० घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर४२०१० पासून ते २०१९ पर्यंतच्या रमाई आवास योजनेतील घरकुल बांधकामाची आकडेवारी प्राप्त झाली असून यावर्षीच्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ९५० घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये मानवत नगरपालिकेअंतर्गत १३३, जिंतूर १३०, पूर्णा २८३, सोनपेठ ४८, पाथरी २२४, सेलू ५४ आणि गंगाखेड शहरात ७८ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.६ कोटी रुपयांचा निधी शिल्लक४या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ६ कोटी १७ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून, त्यात मानवत पालिकेकडे १ कोटी ४१ लाख, जिंतूर पालिकेकडे १ कोटी १५ लाख, पूर्णा पालिकेकडे १ लाख ५६ हजार, सोनपेठ पालिकेकडे ११ लाख २९ हजार, पाथरी पालिकेकडे २ कोटी ७२ लाख, सेलू पालिकेकडे ७५ लाख ५८ हजार रुपये शिल्लक आहेत.पूर्णा शहरात सर्वाधिक निधी खर्च४आतापर्यतच्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत पूर्णा शहरामध्ये सर्वाधिक ७ कोटी ५ लाख ९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तर त्या खालोखाल पाथरी शहरात ४ कोटी ३७ लाख १५ हजार रुपये, गंगाखेड शहरात ४ कोटी १६ लाख ५० हजार रुपये.४सेलू शहरात ३ कोटी ९९ लाख ९२ हजार रुपये, मानवत शहरात ३ कोटी ८२ लाख ३० हजार रुपये, सोनपेठ शहरात ३ कोटी १३ लाख २१ हजार रुपये आणि जिंतूर शहरात २ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघर