शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:29 IST

मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.जून महिना आर्ध्यावरती आला असताना मान्सूनचे आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकºयांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेच असल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.निसर्गाने साथ न दिल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जबाजारी शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी उसनवारीने पैसे जमा करीत आहेत. राज्य शासनाने संपूर्ण तालुक्यात अति दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते.संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जवळ असलेली सर्व पुंजी खर्च झाली असून खाजगी कर्ज काढून पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत शेतकºयांनी करुन ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकुणच शेतीची मशागतीचे कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.पारंपरिक बियाणांचा झाला वापर कमी४पूर्वी शेतकरी घरातील पारंपरिक बियाणांचा वापर करीत होते; परंतु, काळाच्या ओघात काही वषार्पासून पेरणीसाठी संकरित बियाणांचा वापर वाढला आहे. शेतकºयांनी बियाणांची जमवाजमव करुन ठेवली आहे. मानवत तालुक्यात कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण हे शेतकºयांसह सर्वासाठीच चिंतेची बाब ठरत आहे.४तालुक्यात वाढत असलेली पाणी टंचाईची दाहकता आणि पावसाभावी रखडत असलेली पेरणी शेतकºयांसमोर चिंता उभी करीत आहे. यामुळे बियाणे घरात येऊन पडलेली असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी? असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.खताच्या किंमतीमध्ये झाली वाढ४निसर्गाचे संकट समोर असताना यंदा खताच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.४शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किंमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना चांगल्या प्रतिचा खत घेणे अशक्य होणार आहे.बाजार थंडावलापाऊस लांबल्याने बियाणे खते, यासह शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, खरेदीसाठी होणारी गर्दी सध्या तरी दिसत नाही. आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी