शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणी : पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाल्यांना पूर; अनेक मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:59 IST

पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हावासियांना मान्सूनच्या पावसाने ताण दिला असला तरी परतीच्या पावसाने मात्र दिलासा देण्याबरोबरच नुकसानीलाही सामोरे जाण्याची वेळ आणली आहे. जिल्ह्यात सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. पावसाळा संपण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यत जिल्ह्यामध्ये २०० मि.मी. पावसाची तूट होती. ही तूट ८ दिवसातच परतीच्या पावसाने भरुन काढली आहे. जिल्ह्यात आता ७३६ मि.मी.पाऊस झाला आहे.गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. संततधार आणि मध्यम स्वरुपाचा हा पाऊस सलग ३ ते ४ तास बरसला. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. २४ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार परभणी तालुक्यात २९.२३ मि.मी., पालम ५४, पूर्णा ३.६०. गंगाखेड २३.२५, सोनपेठ ४२, सेलू ७२.४०, पाथरी ८३.३३, जिंतूर ४०.८३ आणि मानवत तालुक्यात ७७.६७ असा जिल्हात सरासरी ५०.३७ मि.मी. पाऊस झाला.सुनेगाव- सायाळा पुलावर पाणी४गंगाखेड- जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून तालुक्यातील सुनेगाव-सायाळा येथील पुलावर पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली. वाहणाºया इंद्रायणी नदीला पूर आल्याने सुनेगाव, व सायाळा गावाजवळील पुलावर पाणी साचल्याने सायाळा, सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांची वाहतूक बंद झाली. सायाळा येथून गंगाखेडकडे येण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला.देऊळगाव : १९१ मि.मी. पाऊससेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात तब्बल १९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पालम तालुक्यातील बनवस मंडळात ६५ मि.मी., सोनपेठ ६८ मि.मी., चिकलठाणा ७३ मि.मी., पाथरी ८१, बाभळगाव ८०, हादगाव ८९, मानवत ९०, केकरजवळा ७८ आणि कोल्हा मंडळामध्ये ६५ मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूर