Parbhani doctor's rally; | परभणीत डॉक्टरांची रॅली, मानवतमध्ये निवेदन
परभणीत डॉक्टरांची रॅली, मानवतमध्ये निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पश्चिम बंगालमधील कोलकता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिशएनच्या परभणी येथील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातून रॅली काढून पोलीस अधीक्षकांना सदरील घटनेच्या निषेधाचे निवेदन दिले.
परभणी शहरातील खाजगी डॉक्टर्स सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशनरोड, डॉक्टरलेन, नारायणचाळ मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयावर रॅली काढण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये कोलकत्ता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, डॉक्टरांना संरक्षण देणाºया कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ.परमेश्वर साळवे, सचिव डॉ.अमिताभ कडतन, डॉ. गोपाल जवादे, डॉ.भक्कड, डॉ.मीना परतानी, डॉ. विद्या चौधरी, डॉ. राजू सुरवसे, डॉ. विवेक नावंदर, डॉ.श्रीकांत मणियार, डॉ.विकास धर्माधिकारी, डॉ.सुधीर काकडे, डॉ.सुधांशू देशमुख, डॉ.भूतडा आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी उपस्थित खाजगी डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पाथरी येथेही कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ खाजगी डॉक्टर्स असोसिशएनच्या वतीने दुपारी २ वाजता तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉक्टरांनी दिवसभर काळ्या फिती लावून आंदोलन केले.
मानवतमध्ये तहसीलदारांना निवेदन
४मानवत- येथील डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने १७ जून रोजी कोलकत्ता येथील घटनेच्या निेषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भात तहसीलदार डी.डी.फुफाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.योगेश तोडकरी, उपाध्यक्ष डॉ.अक्षयदीप खडसे, डॉ.राजकुमार लड्डा, डॉ.सचिन कदम, डॉ.विठ्ठल काळे, डॉ.कैलास चांदकर, डॉ.खेकाळे, डॉ.विजय कहेकर, डॉ.राजेश लाठकर, डॉ. शरयू खेकाळे, डॉ. राजेश्वर दहे, डॉ. शाम वाघमारे, डॉ. भारत कदम, डॉ. किरण कडतन, डॉ. सचिन चिद्रवार, डॉ. संजय मुंदडा, डॉ.नामदेव हेंडगे, डॉ.सुरेश सपाटे, डॉ.निरज दगडू, डॉ.निनाद दगडू, डॉ. बाकळे आदींची उपस्थिती होती.
शासकीय रुग्णालयांत गर्दी
४कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ खाजगी डॉक्टरांनी सोमवारी आंदोलन केले. अनेक ठिकाणच्या ओपीडी या अनुषंगाने बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुक्याच्या ठिकाणावरील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी रुग्णांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची सोय झाली होती.
काळ्या फिती लावून निषेध
४सोनपेठ- कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ सोनपेठ येथे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टर असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. यावेळी अध्यक्ष डॉ.बालाजी पारसेवार, उपाध्यक्ष डॉ.गणेश मुंडे, डॉ.श्रीनिवास गुळभिले, डॉ.फुलचंद काबरा, डॉ.धनंजय पवार, डॉ.सतीश आरबाड, डॉ.कल्पना लांडे, डॉ.सचिन कसपटे, डॉ. राजगोपाल राठी आदींची उपस्थिती होती.
गंगाखेडमध्ये कारवाईची मागणी
४गंगाखेड- कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ गंगाखेड शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच शहरातील डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
४ तसेच डॉक्टरांना संरक्षण देणाºया कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. हेमंत मुंडे, डॉ.कृष्णा पवार, डॉ.विजयकुमार बडे, डॉ.मनिष बियाणी, डॉ. केशव मुंडे, डॉ. देविदास चव्हाण, डॉ.लहु जाधव, डॉ.बालासाहेब मानकर.
४ डॉ.फेरोज शेख, डॉ.केंद्रे, डॉ.श्रीहरी धापसे, डॉ.भरत भोसले, डॉ.प्रल्हाद सोळंके, डॉ.योगेश मल्लूरवार, डॉ.श्रीहरी टाले, डॉ.परमेश्वर सोडगीर, डॉ.विठ्ठल तिडके, डॉ.दत्तराव भिसे, डॉ.ज्ञानोबा धुमाळ, डॉ.दिलीप नागरगोजे, डॉ.अनिल बर्वे, डॉ.युसूफ खान औरंगाबादकर आदींची नावे आहेत.
सेलूत ३० डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून केला निषेध
४सेलू- कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ सेलू शहरातील ३० डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवली. सेलू शहरातील खाजगी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जनार्दन गोळेगावकर, सचिव डॉ.सचिन काळे, उपाध्यक्ष डॉ.कैलास आवटे, कोषाध्यक्ष डॉ.सुदर्शन मालाणी, डॉ.सविता साडेगावकर आदींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. यानिमित्त शहरातील सर्व खाजगी रुग्णालये बंद होती.


Web Title: Parbhani doctor's rally;
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.