शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

परभणी जिल्हा; बारा हजार दलघमीचा शाश्वत पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:04 IST

जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ११ हजार ९७१ दलघमी शाश्वत पाणीसाठा जमा झाला आहे. उन्हाळ्यातील टंचाई परिस्थितीत हे पाणी जिल्हावासीयांना वापरासाठी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ११ हजार ९७१ दलघमी शाश्वत पाणीसाठा जमा झाला आहे. उन्हाळ्यातील टंचाई परिस्थितीत हे पाणी जिल्हावासीयांना वापरासाठी मिळणार आहे.राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. प्रशासनाने १३९ कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांना या वर्षात मंजुरी दिली. साधारणत: ४ हजार ७७१ कामांचे कार्यरंभादेश देण्यात आले. त्यातून ३ हजार ७१६ कामे पूर्ण झाली. शेततळे, सलग समतल चर, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारे ही कामे झाली. मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी झालेल्या पावसाचे पाणी बंधाऱ्यात अडल्याने आणि शेततळ्यात चांगला पाणीसाठा झाल्याने बºयापैकी पाणीसाठा झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये फारसी पाणी टंचाई जाणवली नाही. तसेच भूजल पातळी स्थिर ठेवण्यासही मदतही झाली. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यानुसार मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे ११ हजार ९७१ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यामध्ये हा पाणीसाठा टंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.२६ कोटी रुपयांचा खर्चजिल्ह्यात मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांवर २६ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या खचार्तून १२ हजार दलघमी शाश्वत पाणी मिळत असेल तर ती जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी ठरत आहे. शेततळे, बंधाºयात साठलेले पाणी उन्हाळ्यात ग्रामस्थांना उपयोगात येत असेल तर जलयुक्तची कामे आणखी गांभीर्याने करण्याची गरज आहे. सध्या या योजनेत बनावट कामे होत असल्याच्याही तक्रारी आहेत. काही गावात प्रत्यक्षात कामे सुरू नसताना कामे झाल्याचे दाखविले जाते. तेव्हा चांगल्या योजनेतही भ्रष्ट्राचार झिरपत असेल तर जिल्ह्याची दुष्काळाची परिस्थिती बदलण्यास बराच वेळ लागेल. तेव्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.वर्षभरात झालेली कामे व जलसाठातालुका झालेली कामे उपलब्ध जलसाठासेलू ४४८ १,९८९जिंतूर ८०० ९९३परभणी ५१३ १४२९मानवत ३८९ ६७३पाथरी २५४ २५५सोनपेठ १९८ १,१६१गंगाखेड ५५५ ४७७१पालम १७५ ६३७पूर्णा २४९ ६३एकूण ३६१७ ११९७१

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी