शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:44 IST

राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे़पावसाळा सुरू होवून दोन महिने लोटले तरी देखील अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापपर्यंत ज्योत्याखालीच आहे़ धरणाखालील पूर्णा नदी देखील भर पावसाळ्यात कोरडीठाक आहे़ त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ मृग नक्षत्र ८ जूनपासून सुरू झाले़ मात्र हे नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले़ त्यानंतर मृगनक्षत्रातही शेतकऱ्यांच्या पेरण्याच झाल्या नाहीत़ त्यामुळे २२ जून रोजी लागलेल्या आर्द्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते़ मात्र या नक्षत्रात देखील दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असलेले येलदरी धरण देखील यावर्षी मृत साठ्याच्यावर आले नाही़ त्यामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ धरणाखालील पूर्णा नदीचे पात्र भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे़ त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही तर परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ हीच परिस्थिती पावसाळाभर राहिली तर जिल्ह्याचा दुष्काळवाडा झाल्याशिवाय राहणार नाही़ त्यामुळे प्रशासनानेही ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़गतवर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस४गतवर्षीच्या तुलनेत निम्मा म्हणजेच १४० मिमी पाऊस या भागात कमी झाला आहे़ धरणातील पाणीसाठाही गतवर्षी मृतसाठ्यात होता़ याही वर्षी तर २३ दलघमी मृतसाठ्यापेक्षाही कमी आहे़ यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे़ हीच परिस्थिती येलदरीच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर धरणाची आहे़४हे धरण देखील ज्योत्याखालीच आहे़ या धरणातील मृत पाणीसाठ्यात सुद्धा ५९ दलघमी पाणीसाठा कमी आहे़ त्यामुळे या धरणात सध्या केवळ १११ दलघमी मृत पाणीसाठा शिल्लक आहे़ खडकपूर्णा धरणात देखील मृतसाठ्यात पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे स्थिती गंभीर होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणRainपाऊस