शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परभणी : जायकवाडीच्या पाण्याचा चार वितरिकांमधून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:24 PM

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाथरी तालुक्यात दाखल झाल्यानंतर चार वितरिकांमधून ते सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर शेत जमिनीला सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाथरी तालुक्यात दाखल झाल्यानंतर चार वितरिकांमधून ते सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर शेत जमिनीला सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.जायकवाडी धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रातील पाणी काही दिवसांपूर्वी पाथरी तालुक्यात दाखल झाले. त्यानंतर पाथरी तालुक्यातील जायकवाडीचा डावा कालवा आणि गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव व मुद्गल येथील बंधाऱ्यात पाणी आल्याने दोन्ही बंधाºयात राखीव पाण्याचा साठा ठेवून हे पाणी खाली सोडण्यात येत आहे. शुक्रवारी ढालेगाव बंधाºयात ३.४६ तर मुद्गल बंधाºयात २ दलघमी पाणीसाठा होता. जायकवाडी धरणातून १६०० क्युसेसने सोडलेल्या पाण्यातील ११८० क्युसेस पाणी जायकवाडीचा मुख्य कालवा १२२ वर विसर्ग होत आहे. ढालेगाव बंधाºयासाठी डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आलेले आहे.आता जायकवाडीच्या शाखा कालवा देवनांद्रा येथील बी-५९ वरुन २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग सध्या सिंचनासाठी वाघाळा, गुंज, लोणी, बाबुलतार, टाकळगव्हाण, सारोळा, तुरा या भागात करण्यात येत आहे. वितरिका क्रमांक ५९ अ मधून पोहेटाकळी, रेणापूर भागात ४० क्युसेसने तर वितरिका क्रमांक ४७ वरुन कासापुरी, पाथरगव्हाण बु., बाणेगाव, जवळा झुटा भागात ८० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तसेच वितरिका क्रमांक ४९ वर हदगाव, वरखेड या भागात ५० क्युसेस आणि वितरिका क्रमांक ६१ वर केकरजवळा, इटाळी, पिंपळगाव, सारोळा बु. या भागात ६० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. चार वितरिकांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे, अशी माहिती उपअभियंता डी.बी.खारकर यांनी दिली.पाथरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला४पाथरी शहराला ढालेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. बंधाºयात सध्या ३.४६ दलघमी पाणीसाठा आहे. पाथरी नगरपालिकेने येथे ३.४६ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.४त्यामुळे एवढे पाणी शिल्लक ठेवून इतर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी बंधाºयात मूबलक पाणी उपलब्ध असल्याने पाथरी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी