शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मानवत तहसीलसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:46 IST

तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.मागील चार महिन्यांपासून हमदापूर गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.ग्रामसेविकेने पाणीटंचाई निवारणा संदर्भात पंचायत समितीकडे पाठपुरावा करणे अपेक्षित असताना ग्रामसेविका तीन महिन्यांपासून गावात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन केला आहे. वांरवार मागणी करुनही उन्हाळाभर ग्रामस्थांना पाणी उपलब्ध झाले नाही. त्यातच ग्रामसेविका गैरहजर राहत असल्याने कारवाई करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सरपंच सीमा ज्ञानोबा निळे, भागवत गायकवाड, किरण शिंदे, उत्तम शिंदे, हनुमान शिंदे, मधुकर उफाडे, नामदेव उफाडे, विद्याधर गायकवाड, भागुबाई निळे, सचिन हरबडे, माऊली शिंदे, परमेश्वर टिपरे, सिद्धार्थ गायकवाड, गौतम सहजराव, हरिभाउ उफाडे, भगवान निळे, निवाजी उफाडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील डी.डी. फुफाटे यांना निवेदन देण्यात आले. गटविकास अधिकारी डी.बी. घुगे यांनी कारवाई संदर्भात आश्वासन दिले.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलनTahasildarतहसीलदार