परभणी:वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:55 AM2019-07-20T00:55:24+5:302019-07-20T00:55:34+5:30

शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.

Parbhani: Deletion of tree plantation scheme | परभणी:वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा

परभणी:वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिमंडळांतर्गत वडाळी नियतक्षेत्रांतर्गत मानकेश्वर परिसरातील किन्ही रस्त्यावर सर्वे नंबर ७२ मध्ये २५ हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्यात आले आहेत. वृक्ष लावण्यासाठी खोदण्यात आलेले हे खड्डे महाराष्ट्रातील निकृष्ठ खड्डे खोदण्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. जेसीबीचे खोरे ओरबडून अर्ध्या फुटांपेक्षाही कमी खोल चर सीसीटीसारखे काढून त्यातून निघालेल्या मुरूमामध्ये ही झाडे लावण्यात आली आहेत.
दगड-माती, लाल माती यांच्यात लावलेली झाडे किती दिवस टिकतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे विभागीय वन अधिकारी यांनी ज्या दिवशी या भागाला भेट दिली, त्याच दिवशी वृक्ष लागवडीचा नमुना पहावयास मिळाला. वृक्ष लागवडीसाठी कुठलेही नियोजन नाही. शासकीय कार्यक्रम आहे याच धर्तीवर वृक्षलागवड करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा वन विभाग फस्त करीत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
यंत्रांनी केले लागवडीसाठी खड्डे
४वृक्ष लागवडीसाठी मजुराच्या हाताने खड्डे करणे गरजेचे असताना जेसीबीच्या साह्याने कोणतेही निकष न पाळता केवळ जमीन ओरबाडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही वृक्ष लागवड औटघटकेची ठरणार असून शासनाने केलेल्या खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे.
४या प्रकाराची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर वृक्ष लागवडीसाठी काळ्या मातीचा वापर होणे गरजेचे असताना लावलेल्या वृक्षावर वरच्या बाजूने काळी माती टाकून देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न वन विभागाचा आहे.
४विशेष म्हणजे २० ते २५ ट्रॅक्टर काळी माती असूनही २५ ते ३० ट्रॅक्टर पांढरा मुरूम आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे शासन पैसे खर्च करीत असले तरी अधिकारी मात्र स्वत:चे चांगभले करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.
४वृक्ष लागवड करीत असताना भविष्यात वृक्ष वाढविण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र वनविभागाकडून डोंगरावर लावलेल्या वृक्षासाठी कुठलीही सिंचनाची व्यवस्था केलेली नाही. मुरमाड जमीन असल्याने झाडांना आठ दिवसात पाणी मिळाले नाही तर हे वृक्ष राहतील की, नाही? याबाबत साशंकता आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याने वृक्ष लागवड ची सुरक्षा कशी होणार हा प्रश्न आहे.
या प्रकरणात करण्यात आलेली कामे किती दर्जेदार आहेत, याची पाहणी सुरू असून बोगस कामे करणाºयांवर कार्यवाही करून व संबंधित कामाचीही चौकशी करण्यात येईल.
-विजय सातपुते, उपविभागीय वन अधिकारी, परभणी

Web Title: Parbhani: Deletion of tree plantation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.