शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शासकीय गोदामात वाद घालणाऱ्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:42 IST

तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पेठशिवणी येथे तहसील कार्यालयामार्फत स्वस्तधान्य दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी गोदाम आहे. या गोदामातून तालुक्यात शासनाच्या स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येते. मागील पंधरा दिवसांपासून या गोदामात धान्य घोटाळा झाल्याने राज्यभर याची चर्चा सुरू आहे. येथील गोदामपालचा पदभार न घेतल्याने जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सुमेध वाघमारे या कर्मचाººयाला निलंबित केले आहे. कामाचा पदभार तहसील कार्यालयातील कारकून प्रल्हाद वाकोडे यांना देण्यात आला आहे. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ते गोदामात गेले होते. याचदरम्यान वाहतूक ठेकेदार प्रतिनिधी अरुण पवार यांचा ट्रक शासकीय धान्य घेऊन गोदामात आला होता. या ट्रकमधून माल उतरणे चालू होते. हमाल हा माल उतरत असताना पोते फोडून माल काढला जात असल्याचा प्रकार सुरू होता.याच दरम्यान रुपेश सोनटक्के यांनी हा काय प्रकार चालू आहे? माल का काढून घेतला जात आहे, अशी विचारणा करीत गोदामाची व माल काढून घेतानाची शुटींग करणे चालू केले. यावेळी गोदामपाल वाकोडे व देशमुख यांच्यात वाद झाला त्यानंतर बारा वाजण्याच्या दरम्यान स्वस्त धान्याचे वाटप करण्यासाठी ट्रक तांदूळवाडी व वरखेड येथे जात असताना रुपेश देशमुख व सचिन पाटील या दोघांनी वाहन अडविले तसेच गोदामातील रजिस्टर व परमिटचे मोबाईल मध्ये फोटो काढून घेतले.गोदामपाल वाकोडे हे नवीन असल्याने त्यांना गोदामातील प्रकार लक्षात आला नाही. त्यांनी तहसीलदार कदम यांच्याशी चर्चा करून माहिती देतो, असे देशमुख यांना सांगितले; परंतु, त्यांनी वाकोडे यांचे न ऐकता वाद घालून शासकीय कामात अडथळा आणीत धमकी दिल्याची फिर्याद प्रल्हाद बाबूसा वाकोडे यांनी पालम पोलिसांमध्ये दिली. त्यानंतर २४ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता याप्रकरणी रुपेश सोनटक्के व सचिन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार नामदेव राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदारCrime Newsगुन्हेगारी