शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

परभणी:अर्धवट वर्गखोल्यांचे बांधकाम धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:07 IST

तालुक्यातील खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अर्धवट स्थितीत बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या तात्काळ जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अर्धवट स्थितीत बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या तात्काळ जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.तालुक्यातील खळी गावामध्ये हनुमान मंदिराजवळ असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्थलांतर करण्यासाठी गौंडगाव रस्त्यालगत २००७-०८ साली शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले. हे काम २००९ मध्ये पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा हलविण्यात आली होती. शाळा स्थलांतर करताना शाळेच्या पाठीमागील बाजूस स्वयंपाक घर व वर्गखोलीचे बांधकाम अर्धवट स्थितीत राहिले होते. शाळेचे स्थलांतर झाल्याच्या काही महिन्यातच या अर्धवट बांधकामावरील एका खोलीच्या खिडकीची तंडी कोसळून एका विद्यार्थ्याला आपला एक हात कायमचा गमवावा लागला होता. ही घटना घडल्यापासून हे काम आहे त्या स्थितीतच पडून राहिल्याने वर्गखोल्यांसाठी टाकलेल्या तंड्यांचा साचा सद्य स्थितीत जीर्ण होऊन केव्हाही कोसळेल, या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे शाळेच्या मध्यंतरात या अर्धवट बांधकाम परिसरात विद्यार्थी लघुशंका तसेच खेळण्यासाठी जात असल्याने येथील बांधकाम केव्हाही कोसळुन विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी अर्धवट स्थितीत असलेले व विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणारे हे बांधकाम पूर्ण करावे किंवा पाडावे, अशी मागणी होत आहे.प्रस्ताव शिक्षण विभागाकडेखळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या अर्धवट असलेल्या शाळा खोल्यांचे जीर्ण झालेले बांधकाम पाडून टाकण्याची मागणी पालक वगार्तून होत आहे. गटशिक्षण अधिकारी यांच्या सुचनेनुसार शाळेला भेट देऊन अर्धवट स्थितीतील धोकादायक झालेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर हे बांधकाम पाडण्यासाठीचा प्रस्ताव मुख्याध्यापकांकडून मागवून घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती गटसाधन केंद्रातील अभियंता भोंबडे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाzpजिल्हा परिषद