शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:49 IST

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जून महिन्यामध्ये तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, रस्ते, स्मशानभूमी आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने तालुक्यात सुमारे एक लाख झाडे लावली. दरवर्षी वृक्ष लागवड योजना राबविली जाते. मात्र संवर्धनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.त्यामुळे वर्षानुवर्षापासून गाजावाजा करून केवळ अभियान राबविले जात असून वृक्षांचे संवर्धन मात्र होत नाही. यावर्षी या योजनेत निसर्गानेही खोडा घातला आहे. तालुक्यात एक महिन्यापासून पाऊस झाला नसल्याने लावलेली झाडे वाळत आहेत. त्यामुळे या अभियानाचाच बोजवारा उडण्याची स्थिती पालम तालुक्यात निर्माण झाली आहे.लोकसहभाग मिळूनही यंत्रणेचे दुर्लक्षतालुक्यातील आरखेड, पेठशिवणी व कापसी ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे १५ हजार रोपांची लागवड लोकसहभागातून केली. यासाठी ५० ते १ लाख रुपयांची पदरमोडही ग्रामस्थांनी केली. मात्र वृक्ष संगोपन करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. निधी नसल्याने झाडांना पाणी घालणे, कुंंपन लावणे, काठीचा आधार देणे ही कामे ठप्प पडली आहेत. लोकसहभागातून लावलेली रोपे जगावीत यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करीत असले तरी प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊस