शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:41 IST

ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.संविधान बचाव अभियाना अंतर्गत परभणी येथे १ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचा मेळावा घेण्यात आला.शहरातील राष्ट्रवादी भवन येथे हा मेळावा पार पडल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वसमत रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. भाजप सरकारच्या वतीने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला जात असल्याने ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अर्धातास केलेल्या या आंदोलनामुळे वसमत रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.या आंदोलनात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, माजी प्रांताध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, मीनाताई खरे, सक्षणा सलगर, सोनाली देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, रेखा आवटे, मीनाताई राऊत, माजी खा.गणेशराव दुधगावकर, अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, माजी खा. सुरेश जाधव, संतोष बोबडे, मनपाचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक विष्णू नवले, जाकेर लाला, सुमंत वाघ, किरण तळेकर, आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस