शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:08 IST

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना १० दिवसाआड पाणी मिळत होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी ओरड वाढत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे. शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. चार दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातून पाणी उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरवरील विद्युत रोहित्र जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा आणखीच विस्कळीत झाला होता. हे विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. विद्युत रोहित्र दुरुस्त होऊन पाण्याचा उपसा सुरु झाला असला तरी अनेक प्रभागांना १५-१५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठीची ओरड वाढत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्यामुळेच शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.परभणीसाठी मूबलक पाणीशहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून बंधाºयातील पाणीसाठा संपल्यास निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाल्यानेच शहरवासियांना १५ दिवसांतून एकवेळ पाणी उपलब्ध होत आहे. मनपाने पाणी सोडण्याचे नियोजन करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.नव्या आयुक्तांसमोर आव्हाने४परभणी महानगरपालिकेसाठी आयुक्त म्हणून रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन आयुक्त रुजू होतील. शहरातील स्वच्छतेबरोबरच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर असणार आहे. ते या समस्या कशा पद्धतीने हाताळतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.जलवाहिनीला गळतीशहरात जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. वर्षभरापासून दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय गळतीमुळे टेलपर्यंत पाणी पोहचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.विजेच्या कमी दाबामुळे वाढले रोटेशनराहटी येथील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने तो जळाला होता. त्यानंतर ग्रामीण भागातून वीज जोडणी घेतली आहे. परंतु, आवश्यक तेवढ्या दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा १४ ते १५ दिवसाआड होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने पत्रक काढून कळविले.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई