शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चिमुकलीस पळविणाऱ्या आरोपीस चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:08 IST

घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीस उचलून घेऊन पळून जाणाºया आरोपीला मुलीच्या मातेच्या सतर्कतेमुळे युवकांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वसमत रोडवरील शिवरामनगर येथे घडली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीस उचलून घेऊन पळून जाणाºया आरोपीला मुलीच्या मातेच्या सतर्कतेमुळे युवकांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वसमत रोडवरील शिवरामनगर येथे घडली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील वसमत रस्त्यावर आऱआऱ पेट्रोल पंपाच्या समोर शिवरामनगरात ही घटना घडली. १७ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक महिला अंगणात उभी होती आणि काही अंतरावरच त्यांची अडीच वर्षांची मुलगी खेळत होती़ याच दरम्यान, लुंगी घातलेला एक माणूस त्या ठिकाणी आला़ या व्यक्तीने अंगणात खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला उचलले आणि तो पळून जाण्याच्या स्थितीत असतानाच तिच्या आईचे लक्ष गेले़ त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरात असलेल्या युवकांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले़ बालिकेचे अपहरण करणाºया या आरोपीला बेदम चोप दिल्यानंतर रात्री उशिरा नवा मोंढा पोलिसांकडे त्यास सुपूर्द करण्यात आले़ या आरोपीचे नाव द्वारकासिंह बहात्तरसिंग पाटले (३५) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या प्रकरणी द्वारकासिंह पाटले (रा़ अनुपपूर मध्यप्रदेश) याच्याविरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक गिते तपास करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण