शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर १० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:10 IST

Bribe case in Parabhani : २ कोटींची मागणी करून त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले.

ठळक मुद्देअपघात प्रकरणात मदत करण्यासाठी मागितली लाच

परभणी : अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी २ कोटींची मागणी करून त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना मुंबई येथील लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Parbhani, a case has been registered against a sub-divisional police officer and an police employee for accepting a bribe of Rs 10 lakh for helping in accident case )

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आलेली माहिती अशी, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत ३ मे २०२१ रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ९ जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलून, 'तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये द्यावे, लागतील, असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात २२ जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीत, त्यातील १ कोटी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.  त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना १० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी सेलू येथील पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस