परभणी : बीडीडीएस, श्वान पथकाच्या वतीने जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:42 AM2020-01-07T00:42:15+5:302020-01-07T00:43:26+5:30

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या काळात जनजागृती मोहीम राबविली जात आहे़ या अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या वतीने ३ जानेवारी रोजी गंगाखेड रोडवरील ज्ञानगंगा माध्यमिक शाळा आणि ४ जानेवारी रोजी धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली़

Parbhani: Awareness on behalf of the BDDS, Dog Squad | परभणी : बीडीडीएस, श्वान पथकाच्या वतीने जनजागृती

परभणी : बीडीडीएस, श्वान पथकाच्या वतीने जनजागृती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या काळात जनजागृती मोहीम राबविली जात आहे़ या अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या वतीने ३ जानेवारी रोजी गंगाखेड रोडवरील ज्ञानगंगा माध्यमिक शाळा आणि ४ जानेवारी रोजी धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली़
या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या प्रात्यक्षिकातून श्वान पथकातील श्वान घटनाथस्ळावरील वस्तूंवरून आरोपी कसा शोधतो? संशयित बॅग किंवा बॉम्ब सदृश्य लपविलेली वस्तू श्वान कसा शोधतो? याची माहिती देण्यात आली़ तसेच अनोळखी व्यक्तीकडून दिलेले अन्न श्वान नाकारतो तेच अन्न श्वान हस्तकाकडून तो कसा स्वीकारतो, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ श्वानाचे कार्य, त्याला होणारे आजार, त्यांना देण्यात येणारा सकस आहार या विषयीची माहिती देण्यात आली़
पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आऱ, उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक, मारोती बुधवारे, संतोष वाव्हळ, सीता वाघमारे, शिवाजी काळे, प्रवीण घोंगडे, अमोल सिरसकर, प्रेमदास राठोड, साहेब ताटेवाड, रामचंद्र जाधव, मनोहर लोखंडे, लखनसिंह ठाकूर, इनामदार, महारुद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक गणेश रोहिरे, वर्धेकर, लिंबाळकर यांची उपस्थिती होती़ यावेळी झालेल्या प्रात्यक्षिकात श्वान जॉनी, पंच (डाबरमॅन), रिओ, ओरियन, ब्रुनो (लॅब्राडॉर) या श्वानांनी सहभाग नोंदविला़
पोलिसांची जनजागरण मोहीम
परभणी- महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांच्या वतीने ६ जानेवारी रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली़ पोलीस दलातील दहशतवादविरोधी कक्ष, शहर वाहतूक शाखा आणि सायबर सेलच्या वतीने वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हा उपक्रम घेण्यात आला़
४शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक गजेंद्र सरोदे व प्रशांत वाव्हुळे यांनी वाहतुकीचे नियम तसेच ट्रॅफिक सिग्नल नियमांची माहिती दिली़ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली़ दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती या कक्षाचे भारत नलावडे, दयानंद पेटकर यांनी दिली़
४सायबर सेलचे बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी सायबर क्राईमची माहिती देत असताना सोशल मिडीयाचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ पोलीस विभागाच्या वतीने रायझिंग डे का साजरा केला जातो, या विषयीची माहिती तसेच पोलीस विभागाच्या वतीने चालणाऱ्या कामकाजाची माहिती देण्यात आली़ कार्यक्रमास प्रा़ लासीनकर, ओव्हाळ, पाटील, हत्तीअंबिरे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Awareness on behalf of the BDDS, Dog Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.