शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

परभणी : १४ लाखांच्या प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:17 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे़ अनेक गावांमध्ये पाणीसाठे आटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ आगामी काळात टंचाईची ही परिस्थिती आणखीच गंभीर होण्याची शक्यता आहे़ पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यापासूनच आराखडा तयार केला आहे़आॅक्टोबर ते जून या सात महिन्यांच्या काळात पाणीटंचाईच्या निवारणासाठी २९ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला़ या आराखड्यात अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ मार्च महिन्यापर्यंत या आराखड्यानुसार कामे करण्याची वेळ आली नसली तरी सध्या मात्र टंचाई परिस्थिती उद्भवत आहे़ त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़जिल्ह्यात सद्यस्थितीला आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्याच जोडीला विंधन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांनाही सुरुवात केली जाणार आहे़जिल्हा प्रशासनाने ७४ गावांमधील विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तींना मंजुरी दिली असून, त्यासाठी १४ लाख ६७ हजार ६७८ रुपयांचा निधीही प्रस्तावित केला आहे़ पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून जिल्हा प्रशासनाला ९३ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ या प्रस्तावानुसार भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून अहवाल मागविण्यात आला़ या अहवालानुसार जिंतूर, पूर्णा, गंगाखेड आणि मानवत या चार तालुक्यांमधील ७४ विंधन विहिरींच्या दुरूस्तीच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागातील नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्तीची कामे सुरू होवून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार आहे़

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदparabhaniपरभणीcollectorतहसीलदार