शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

परभणी : पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची होतेय हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:00 AM

तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.पालम तालुक्यात पालम शहर, रावराजूर, पेठ शिवणी, बनवस, तांदुळवाडी व चाटोरी या सहा ठिकाणी पशूसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशूधनाला वेळेवर उपचार मिळावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासनाने हे दवाखाने कार्यरत केलेले आहेत; परंतु, येथील दवाखान्यात गेल्यानंतर औषधींचा तुटवडा असल्याने उपचाराविना जनावरे परतण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. उपचारासाठी लागणारे बँडेज, जखमेवर टाकावयाचे आयोडीन, मिनरल मिक्सर विविध प्रकारच्या लस, औषधींसह जनावरांच्या आजारावर उपचार करणारे इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने दवाखान्यात आलेल्या शेतकºयांचा हिरमोड होत आहे. आजारी पडलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकरी डॉक्टरांशी वाद घालत असल्याचे प्रकार घडतात. वेळप्रसंगी नाईलाजाने शेतकºयांना खाजगी दुकानावर जाऊन औषधी विकत घ्यावी लागत आहे. मागील वर्षभरापासून पशुवैद्यकीय दवाखान्यात महत्त्वाच्या औषधींचा नेहमीच तुटवडा निर्माण होत असून वरिष्ठ अधिकारी याकडे पूर्णत: डोळेझाक करीत आहेत. सध्या सर्वत्र पेरणीचे दिवस चालू असून आजारी पडलेली जनावरे शेतकºयांच्या पेरणीत अडथळा निर्माण करीत असतात. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच ूउपचार होणे गरजेचे आहे.सहा रुग्णालयांवर: ५५ हजार पशुधनाचा भार४पालम तालुक्यात पालम शहर, रावराजूर, पेठ शिवणी, बनवस, तांदुळवाडी व चाटोरी या सहा ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. तालुक्यात ३१ हजार ८०२ बैल, गाय, ९ हजार १७५ म्हैस, १० हजार ७८३ शेळ्या तर ३ हजार ५८५ मेंढ्या आहेत.४ या ५५ हजार पशूधनांचा भार तालुक्यातील सहा पशूवैद्यकीय रुग्णालयावर असला तरी या रुग्णालयात औषधींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष देऊन या रुग्णालयांना औषधींचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.पालम तालुक्यात सहा पशुवैद्यकीय रुग्णालये असून या ठिकाणी जनावरांवर उपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे पशुपालक शेतकºयांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन दवाखान्यांमध्ये औषधींचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा.-रत्नाकर शिंदे , उपसभापती पं.स.पालम

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीmedicineऔषधं