शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:48 AM

बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.जिंतूर येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सुभाष राठी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय खिस्ते, खंडेराव आघाव, सत्यनारायण शर्मा, परमेश्वर काकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, रमण तोष्णीवाल, प्रा. श्रीधर भोंबे, श्रीनिवास तोष्णीवाल, देवेंद्र भूरे, प्रा. दिनेश सन्यासी आदींची उपस्थिती होती.बिºहाडकार अशोक पवार यांचा जन्म तालुक्यातील येनोली या गावी एका पालामध्ये झाला. वडील दगड फोडण्याचे काम करीत असत. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, घरात आठराविश्व दारिद्रय असल्याने शिक्षण घेणे शक्य नव्हते. चौथी वर्गाची परीक्षा केवळ चार दिवस शाळेत जाऊन दिली. राहण्याचे ठिकाण निश्चित नसल्याने दहावी कसाबसा पास झालो. घरून शिक्षणासाठी विरोध, तरीही पालात राहून लोकांकडून भीक मागून वेळप्रसंगी हॉटेलातील उष्टे खावून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाठी परभणीला गेलो, राहण्याचे ठिकाण नसल्याने उपाशी पोटी आठ दिवस बसस्थानकामध्ये झोपलो. पुढे चंद्रपूर गाठले. तेथे वास्तविक जीवनावर ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारांसह ४३ पुरस्कार मिळाले. इतर ५ साहित्यकृती लिहिल्या; परंतु, जन्मभूमी व कर्मभूमीत येता आले नाही. २६ वर्षांनी हा योग प्रेस क्लबने आणून दिल्याने गहिवरून आले आहे. ही भेट माझ्या जीवनातील पुरस्कारापेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात अशोक पवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाबरोबरच ‘जोगवा’ही शब्द सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. ‘जोगवा माघाया आलो तुझ्या दारी, जोगवा दे जोगवा दे’ या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. विजय चोरडिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल वाव्हुळे यांनी प्रास्ताविक तर मंचक देशमुख यांंनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणी