शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खून प्रकरणी आरोपीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:27 IST

येथील जुना मोंढा भागातील महावीर चित्र मंदिराजवळ एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जुना मोंढा भागातील महावीर चित्र मंदिराजवळ एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़येथील महावीर चित्रमंदिर परिसरात डोक्यात फरशीचे घाव घालून शेख मोबीन शेख अखिल याचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९़३० च्या सुमारास उघडकीस आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केले़ सहा तासांतच मुख्य आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला बोरी शिवारातून ताब्यात घेतले होते़ दरम्यान, सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पुंगळे यांनी आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा यास न्यायालयासमोर उभे केले़ तपासासाठी पोलीस कोठडीची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली़ त्यारून न्या़ जाधव यांनी आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा यास ३१ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़भर दिवसा शहरातील बाजारपेठ भागात युवकाचा खून झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली़ पोलिसांना आरोपीकडून प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार शेख मोबीन शेख अखिल हा आरोपीच्या घरासमोर सेल्फी काढत होता़ तसेच सिगारेट ओढत असल्याने हा खून केल्याचे आरोपीने सांगितले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस