शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

परभणी : विद्यार्थ्यांच्या गणेवशासाठीचे ५ कोटी शाळांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:35 PM

जिल्हा परिषद शाळांमधील ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शाळांमधील ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व बीपीएलमधील मुले, मुलींसाठी गणवेश घेण्यासाठी प्रति विद्यार्थी ६०० रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध व्हावा, यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी निधी वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर १७ जूनपासून शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला. त्यानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सांगितले. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १० हजार ४१० विद्यार्थ्यांसाठी ६२ लाख ४६ हजार, जिंतूर तालुक्यातील १५ हजार २३९ विद्यार्थ्यांसाठी ९१ लाख ४३ हजार ४००, मानवत तालुक्यातील ६ हजार २५० विद्यार्थ्यांसाठी ३७ लाख ५० हजार, पालम तालुक्यातील ६ हजार ५५ विद्यार्थ्यांसाठी ३६ लाख ३३ हजार, परभणी तालुक्यातील १५ हजार ५७१ विद्यार्थ्यांसाठी ९३ लाख ४२ हजार ६००, पाथरी तालुक्यातील ८ हजार ९२४ विद्यार्थ्यांसाठी ५३ लाख ५४ हजार ४००, पूर्णा तालुक्यातील ८ हजार ७०३ विद्यार्थ्यांसाठी ५२ लाख २१ हजार ८००, सेलू तालुक्यातील ७ हजार ७०४ विद्यार्थ्यांसाठी ४६ लाख २२ हजार ४००, सोनपेठ तालुक्यातील ५ हजार २८४ विद्यार्थ्यांसाठी ३१ लाख ७० हजार ४०० आणि परभणीतील ७९० विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेश उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले असून याबाबतचा कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे आशा गरुड यांनी सांगितले.६२ हजार मुलींना मिळणार गणवेश४शिक्षण विभागाच्या निकषानुसार एकूण ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार असून त्यात ६२ हजार ९८९ मुलींचा समावेश आहे. याशिवाय अनुसूचित जातीतील १० हजार ६५०, अनुसूचित जमातीतील १ हजार ९८८ व बीपीएलमधील ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीSchoolशाळा