शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:42 IST

समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सेलू तालुक्यातील डिग्रस खु. येथील वाळू धक्क्याचा लिलाव झालेला आहे. या ठिकाणाहून ६०० ब्रास वाळू उचलण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराला महसूल प्रशासनाने दिली आहे. या ठेक्याशिवाय रोहिणा, खेर्डा आणि राजा व हातनूर शिवारातूनही वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात आहे. अगोदरच दुधना नदी पात्र कोरडे पडले आहे. त्यातच अनेक वर्षापासून वाळूचा बेसुमार उपसा केला जात असल्याने नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना ज्या ठिकाणी वाळू शिल्लक आहे, तेथून वाळू तस्कर ट्रॅक्टरद्वारे वाळूचा अवैध उपसा करत आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पाथरी आणि पूर्णा परिसरातूनही गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू हायवा टिप्परद्वारे सेलू शहरात विक्री केली जात आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असतानाही महसूल प्रशासनाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरु आहे. महसूल विभागातील काही कर्मचारी वाळू तस्कराचे हस्तक बनले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे लोकेशन तस्करांना सहज उपलब्ध होत आहे. तर काही अधिकारी माहिती असूनही या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत. १ ब्रासचे वाळूचे ट्रॅक्टर साधारणपणे ३ ते ४ हजार रुपयांना विकले जात आहे. तर गोदावरी पात्रातून हायवाद्वारे वाहतूक केली जाणारी वाळू हजारोच्या दराने विक्री होत आहे. रात्रीच्या वेळी वाळू तस्कर चार चाकी वाहन घेऊन अवैध वाळू वाहतुकीच्या गस्तीवर असतात. तरीही या अधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतुकीचे वाहन चालक गुंगारा देत आहेत. डिग्रस येथील वाळू धक्क्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत आहे; परंतु, येथील वाळू धक्क्याच्या नावावर इतर ठिकाणाहून उचललेली वाळूही तस्कर पचवत आहेत.रात्रीस : खेळ चाले...४मध्यरात्री अवैध वाळू उपसा करुन वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक केली जात असताना वाळू तस्करांची टोळी वाहन रिकामे करेपर्यंत गस्त घालते. एखाद्यावेळी अधिकारी आलेच तर वाहनचालकाला काही वेळातच मोबाईलद्वारे माहिती दिली जाते. त्यानंतर वाहनचालक त्याच ठिकाणी वाळू टाकून पसार होतात.४रात्री रायगड कॉर्नर, पाथरी नाका या परिसरात वाळू तस्करांचा खेळ सुरु असतो. अधिकारी मूग मिळून गप्प बसल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. दररोज हजारो रुपयांची कमाई वाळूच्या माध्यमातून केली जात आहे. या प्रकाराकडे सोयीस्करपणे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक केली जात असेल तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पथके नेमली आहेत. रात्रीच्या वेळी जर काही वाहने वाळूचा अवैधपणे उपसा करुन वाहतूक करत असतील तर कारवाई केली जाईल.-बालाजी शेवाळे, तहसीलदार, सेलू

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग