शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:58 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दिवसानंतर केवळ १० कि.मी. पर्यंतच पाणी पोहचले असून, शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दिवसानंतर केवळ १० कि.मी. पर्यंतच पाणी पोहचले असून, शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोरीसह परिसरातील शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी काही वर्षापूूर्वी जिंतूर तालुक्यातील निवळी येथे करपरा धरण उभारण्यात आले. या धरणातील पाण्यावर २४ कि.मी. अंतरावरील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होऊ शकते. त्यामुळे बोरी, निवळी व परिसरातील शेतकºयांना हे धरण एक वरदान ठरले.यावर्षी जूनपासूनच समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मूग व उडीद ही पिके शेतकºयांच्या हातून गेली. लागवडीवर केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडला नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिके घेण्यासाठी करपरा धरणात मूबलक पाणीसाठा असल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी रबी हंगामातील पेरणीची लगबग सुरू केली. शेतकरी, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. या कालव्यावर चार ठिकाणी पूलही उभारण्यात आले आहेत. पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागाकडून या पुलांची व कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते; परंतु, तसे केले नाही.पंधरा दिवसांपासून सोडण्यात आलेले पाणी केवळ दहा कि.मी. अंतरापर्यंतच पोहचले आहे. त्यामुळे अजूनही १४ कि.मी. अंतरावरील शेतकºयांना पाणीच मिळाले नाही. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाकडून या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी तब्बल ९० टक्के पाणी वाया जात आहे. त्यामुळे रबी हंगामातील पेरणीसाठी करपरा धरणातील पाणी मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी सध्या तरी निराशा आली आहे.पाटबंधारे विभागातील अधिकाºयांनी सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करून कालव्याची व कालव्यावरील पुलांची दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.तक्रारी करूनही : होईना उपयोग४जिंतूर तालुक्यातील निवळी येथे करपरा धरण आहे; परंतु, या धरणाचे कार्यालय बोरी येथे आहे. या कार्यालयाकडे कालव्याच्या दुरुस्ती संदर्भात वेळोवेळी तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कोणताच उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे, हे कार्यालय नेहमीच बंद असते. शाखा अभियंता नेहमीच गैरहजर राहत असल्याने कार्यालयातील कर्मचाºयांवर अंकूश राहिलेला नाही.४त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन कालव्याची व पुलाची दुरुस्ती न करताच पाणी सोडणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून केली जात आहे.दरम्यान, शाखा अभियंता दत्तराव पतंगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कालव्यावरील पाण्याची चार ठिकाणाहून नासाडी होत असल्याचे सांगितले. तेव्हा पतंगे यांनी पाण्याचा झिरपा नेहमीच सुरू राहतो, यासाठी कोणत्याही उपाययोजना करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी