शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाझर तलावांसाठी सव्वा नऊ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:44 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ६६ पाझर तलावांसाठी राज्य शासनाने ९ कोटी १८ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिली असून, या सर्व पाझर तलावांची कामे पूर्ण झाली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ६६ पाझर तलावांसाठी राज्य शासनाने ९ कोटी १८ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिली असून, या सर्व पाझर तलावांची कामे पूर्ण झाली आहेत़जिंतूर तालुक्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ० ते १०० हेक्टर सिंचन प्रकल्पांसाठी २०१७-१८ या वर्षात ६६ गाव/पाझर तलावांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने या पाझर तलावांचे काम पूर्ण करण्यात आले होते़ यामध्ये जिंतूर तालुक्यातील असोला, कान्हा, दगडचोप, सोस, देवठाणा, धानोरा, बोरगळवाडी, घेवंडा, इटोली, कुºहाडी, ब्राह्मणवाडी, नऊहाती, लिंबाळा, घेवंडा, गिरगाव, हनवतखेडा, मोहाडी, कान्हा, पिंप्री, भोसी, करंजी, हलवीरा, धमधम, सावरगाव, सावंगी, नांदगाव, दहेगाव, जाम खु़, संक्राळा, वरुड, पिंपळगाव काजळे, बेलोरा, साखरतळा, अंगलगाव, सोनापूर, भोगाव इ. गावांमधील गाव तलावांचा समावेश आहे़ एकूण ६६ गाव तलावांसाठी ९ कोटी १८ लाख ९ हजार रुपयांच्या निधीची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली होती़ त्यानुसार या निधी वितरणास राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाने मंजुरी दिली आहे़ या गाव तलावांची कामे यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहेत़ त्यामुळे आता काम पूर्ण केलेल्या कंत्राटदारांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे़१३०० हेक्टर जमीन सिंचनाखालीजिंतूर तालुक्यातील ६६ गाव तलावांची उभारणी केल्यानंतर त्या माध्यमातून १३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचा अहवाल मृद व जलसंधारण विभागाने शासनाला दिला आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात या पेक्षा कमी जमीन सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे़ शिवाय करण्यात आलेल्या गाव तलावांतील काही ठिकाणची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत़ या कामाचा दर्जा तपासणीची तसदी लघु पाटबंधारे विभागाने घेतलेली नाही़ या विभागाचे कार्यालय जालना येथे हलविण्यात आले आहे़ त्यामुळे एखाद्या कामासंदर्भात तक्रार करायची असल्यास नागरिकांना जालना गाठावे लागत आहे़ तेथेही ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प