शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

परभणी : ७२४ शेतकऱ्यांचे ५.४० कोटी माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:42 IST

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ७२४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील पिंगळी व सेलू तालुक्यातील गिरगाव येथील ७२४ शेतकऱ्यांचे ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज शासनाने माफ केले असून या संदर्भातील घोषणा सोमवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली. यातील २८ शेतकºयांचा प्रशासनाने सत्कार करण्यात आला. त्यातील दोन शेतकºयांशी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.राज्य शासनाने घोषित केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी योजनेच्या प्रत्यक्ष लाभास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. या अनुषंगाने या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर परभणी तालुक्यातील पिंगळी आणि सेलू तालुक्यातील गिरगाव या गावांची पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केली होती. त्या अनुषंगाने या गावांमधील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आल्या. त्यामध्ये पिंगळी येथील ६२८ व गिरगाव येथील ९६ अशा ७२४ शेतकºयांची यादी परिपूर्ण प्रस्तावांसह जिल्हाधिकाºयांकडे सकाळीच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यानुसार या पिंगळी येथील शेतकºयांचे ४ कोटी ५९ लाख ६१ हजार ५०३ तर गिरगाव येथील शेतकºयांचे ८० लाख ६१ हजार ३७७ रुपये असे एकूण ५ कोटी ४० लाख २२ हजार ८८० रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली.कर्जमाफी झालेल्या शेतकºयांमधील पिंगळीतील २६ व गिरगावमधील २ शेतकºयांना प्रशसनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले होते. या शेतकºयांचा प्रशासनाकडून सत्कार करुन त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्या स्रेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यातील पिंगळी येथील शेतकरी विठ्ठल गरुड यांचे १ लाख १५ हजार ८७५ रुपयांचे आणि गिरगाव येथील शेतकरी बाबाराव दामोधर यांचे १ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. या दोन्ही शेतकºयांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दुपारी १ वाजता व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी शेतकरी विठ्ठल गरुड यांनी, या कर्जमाफीमुळे आपल्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी झाल्याचे सांगितले.त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना त्यांच्या मुलीच्या ५ मार्च रोजी असलेल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन त्यांचे कर्जमाफीबद्दल आभार मानले. बाबाराव दमोधर यांनी या कर्जमाफीबाबत समाधान व्यक्त केले.१३२१ केंद्रावर: प्रमाणिकीकरणाची सुविधा४जिल्हा प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर शेतकºयांची यादी यापुर्वी जाहीर केली असून या शेतकºयांना प्रमाणिकीकरण करणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील १३२१ सीएससी केंद्रावर खात्यांचे आधार प्रामाणिकीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.जिल्ह्यात १२७८ कोटींची कर्जमाफी४परभणी जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ८२३ खातेदारांकडील सुमारे १२७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपयांची कर्जमाफी होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.४या खात्यापैकी १ लाख ९४ हजार ९३५ पात्र शेतकºयांची खाती अपलोड करण्यात आली असून २८ फेब्रुवारी रोजी या योजनेंतर्गत पहिली अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.८ हजार ९०० शेतकºयांचे खाते आधारविना४कर्जमुक्ती योजनेंतर्गंत आधारशी संलग्न असलेल्या खात्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ८२३ खातेदारांपैकी २ लाख १३ हजार ८४६ खाते आधारशी जुळलेले आहेत. ८ हजार ९७७ शेतकºयांची खाते आधार लिंक नसल्याने या शेतकºयांकडून आधार क्रमांक मिळविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने गावागावात स्थापन केलेल्या शेतकरी मदत केंद्राच्या मदत केंद्रातून केले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारFarmerशेतकरी