शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

परभणी : आरोग्य सेवेसाठी १९२ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:27 AM

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावरील समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश असून त्यानुसार परभणी जिल्ह्यात १९२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर या अधिकाºयांकडून ग्रामीण भागात प्रत्यक्ष कामकाज केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावरील समूदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश असून त्यानुसार परभणी जिल्ह्यात १९२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर या अधिकाºयांकडून ग्रामीण भागात प्रत्यक्ष कामकाज केले जाणार आहे़ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी या समस्याच निर्माण होवू नयेत, यासाठी समूदाय आरोग्य अधिकाºयांकडून वेळोवेळी समुपदेशन, उपचार केले जाणार आहेत़ त्यात योगा, प्राणायाम यासह इतर उपायांचा समावेश आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्राचे रुपांतर आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये केले जात आहे़ यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य उपसंचालकांकडून बीएएमएस, बीएचयूएस, बीएस्सी नर्सिंग उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते़ २ फेब्रुवारी रोजी या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ त्यानंतर पात्र ठरलेल्या ३५१ उमेदवारांचे समूपदेशन परभणी येथे १५ फेब्रुवारी रोजी पार पडले़ वरिष्ठ कार्यालयातून पार ठरलेल्या उमेदवारांपैकी गुणानुक्रमे १९२ उमेदवारांची परभणी जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे़ या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व प्रशिक्षण केंद्राचे वाटप शनिवारी मध्यरात्रीपर्यंत चालले़जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एस़पी़ देशमुख, नोडल अधिकारी डॉ़ प्रकाश डाके, माता बाल संगोपन अधिकारी डॉ़ गणेश सिरसूलवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ रमेश खंदारे, डॉ़ कालिदास निरस यांच्यासह अधिकाºयांच्या उपस्थितीत पात्र समूदाय आरोग्य अधिकाºयांचे समूपदेशन करून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली़परभणी जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, २१५ उपकेंद्र आहेत़ त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९२ उपकेंद्रासाठी समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती झाली आहे़ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे अधिकारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत़ त्यामुळे आरोग्य उपकेंद्र आणखी बळकट होवून ग्रामस्थांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे़असंसर्गजन्य आजारांवर उपचार४ग्रामीण भागामध्ये कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांवर आरोग्य केंद्रातच उपचार व्हावेत, या उद्देशाने समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या असंसर्गजन्य आजारांवर सामूदायिक वैद्यकीय अधिकाºयांकडून ग्रामीण भागातच उपचार व्हावेत, या उद्देशाने सामूदायिक वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार हे आरोग्य अधिकारी ग्रामीण भागामध्ये जनजागृतीबरोबरच उपचाराचेही कामकाज करणार आहेत़विविध ठिकाणी होणार प्रशिक्षण४निवडलेल्या १९२ समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती केल्यानंतर या अधिकाºयांना परभणी, हिंगोली, तुळजापूर, उस्मानाबाद आणि जळगाव येथील प्रशिक्षण केंद्रावर सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार प्रशिक्षण केंद्रांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली़या उद्देशाने राबविली योजना४ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र हे आरोग्य केंद्राबरोबरच आरोग्य वर्धिनी केंद्र बनावे़४याचाच अर्थ आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होवू नये, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य सदृढ रहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे़ कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार लवकर लक्षात येत नाहीत़४दुसºया व तिसºया टप्प्यात हे आजार निदर्शनास येतात व त्यानंतर उपचार करणे अवघड होते़ हे आजार लवकर कळावेत, यासाठी समूदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHealthआरोग्य