शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १३ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:35 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९ व माध्यमिकच्या ४ अशा १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९ व माध्यमिकच्या ४ अशा १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतात़ या अनुषंगाने जि़प़च्या शिक्षण सभापती तथा उपाध्यक्षा भावनाताई नखाते आणि शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाव्हूळ यांनी मंगळवारी या पुरस्कारांची घोषणा केली़ त्यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातून विलास एकनाथ कुरवाडे (जि़प़ शाळा पिंगळी, ता परभणी), लक्ष्मण हनुमंत गिते (जि़प़ शाळा आहेरवाडी, ता़ पूर्णा), अनंतकुमार कुशेबा देवळे (जि़प़ शाळा धानोरा बु़, ता़ जिंतूर), धनंजय अंगद कोल्हे (जि़प़ शाळा नरळद, ता़ गंगाखेड), मनीषा दगडू कासले (जि़प़ शाळा पुयणी, ता़ पालम), अवधूत काशीगीर गिरी (जि़प़ शाळा पोहंडूळ, ता़ सोनपेठ), ताराचंद हिरामण चव्हाण (जि़प़ शाळा, डिग्रस, ता़ सेलू), नुसरत फातेमा इलियास (जि़प़ शाळा शाखा क्रमांक १, मानवत), शेख मुफस्सीर मो़ अब्दुल रहेमान (जि़प़ शाळा इंदिरानगर, ता़ पाथरी) या ९ शिक्षकांना तर माध्यमिकमधून रामराव नारायण पुणे (जि़प़ शाळा राणीसावरगाव, ता़ गंगाखेड), सुनीलकुमार सत्यनारायण तोष्णीवाल (जि़प़ शाळा कोल्हा, ता़ मानवत), हरिहर सखाराम खिरे (जि़प़ शाळा देऊळगाव गात, ता़ सेलू), नारायण बाबाराव शिंदे (जि़प़ प्रशाला शेळगाव, ता़ सोनपेठ) या ४ अशा एकूण १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे़५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची तर अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड आणि व्यासपीठावर उपाध्यक्षा भावनाताई नखाते, बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती राधाताई सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, डॉ़ कैलास घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास विसपुते, डाएटचे प्राचार्य अनिल गौतम आदींची उपस्थिती राहणार आहे़ या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण सभापती भावनाताई नखाते व शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाव्हूळ यांनी केले आहे़त्र्यंबक वडसकर, सिद्धार्थ मस्के यांना राज्यस्तरीय पुरस्कार४राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानेही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे़ त्यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जि़प़ केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सिद्धार्थ विठ्ठलराव मस्के यांना तर माध्यमिकमधून परभणी तालुक्यातील पोखर्णी येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक त्र्यंबक पंडितराव वडसकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़४५ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण मुंबई येथील रंग शारदा मंदिर येथील सभागृहात करण्यात येणार आहे़ यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकzpजिल्हा परिषद