शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

परभणी:४३६ कि.मी.च्या जलवाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:29 IST

बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परभणीकरांची पाणी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परभणीकरांची पाणी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.परभणी शहराची पाण्याची समस्या दूर व्हावी, या उद्देशाने २००८ मध्ये युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी राहाटी येथील पाणीपुरवठा योजनचा ३० वर्षांपूर्वीची आहे. या काळात शहराची लोकसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे राहाटीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना वेळेत आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला पाणी वितरण करताना कसरती कराव्या लागत आहेत. सध्या शहराला १५ दिवसांना एक वेळा म्हणजे एका महिन्यात केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे राहाटीच्या बंधाऱ्यात मुबलक पाणी असतानाही परभणीकरांना मात्र कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरवासियांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन वर्षांपासून महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती दिली आहे. २००८ पासून रखडलेली ही योजना आता अमृत योजनेत मिळालेल्या १०२ कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण केली जात आहे. या योजनेचे दोन टप्पे करण्यात आले असून, त्यातील पहिला टप्पा येलदरी येथील उद्भव विहीर ते परभणी शहराजवळ उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे हा आहे. तो पूर्ण झाला आहे. दुसºया टप्प्यात शहरातील अंतर्गत जलवाहिनी टाकणे, जलकुंभ उभारणे, रायझींग लाईनपासून ते जलकुंभापर्यंत पाणीपुरवठा करणे, व्हाल्व्ह बसविणे आदी कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता दुसºया टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत.शहराच्या विविध भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. अमृत योजनेअंतर्गत १७० किलोमीटर आणि यु.आय.डी.एस.एस.एम.टी. योजनेअंतर्गत २६६ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, काही भागात वाढीव जलवाहिनी टाकली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेने जलवाहिनी टाकण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला जलवाहिनीला आवश्यक त्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे, पाण्याचे वितरण करण्यासाठी जलवाहिनीतून येणाºया पाण्याची चाचणी घेणे ही कामे शिल्लक आहेत. जलवाहिनी अंथरण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याने आता ही योजना दृष्टीक्षेपात आली असून, लवकरच योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.अतिवृष्टी : कामांवर झाला परिणाम४येलदरीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र जिंतूर रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे आधी टाकलेली जलवाहिनी काढून ती रस्त्याच्या कडेने टाकण्याचे काम हाती घ्यावे लागले.४७ कि.मी. अंतराचे हे काम सुरू केल्यानंतर जिल्ह्यात परतीच्या पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर हे कामही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील जलवाहिनीच्या कामावरच महापालिकेने लक्ष केंद्रीत करुन ही कामे पूर्ण करुन घेतली आहेत.४शहरातील किरकोळ कामे बाकी असून, डिसेंबर महिन्यापर्यंत शिल्लक कामेही पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.१५ जलकुंभांतून पाण्याचे वितरण४शहरातील सर्व विभागामध्ये समान पाण्याचे वितरण व्हावे, या उद्देशाने नवीन योजनेअंतर्गत मनपाने १५ जलकुंभाचे नियोजन केले आहे. त्यातील काही जलकुंभ अमृत योजनेअंतर्गत बांधले जात आहेत तर काही जलकुंभांचे काम यु.आय.डी. योजनेअंतर्गत यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.४बहुतांश जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला पार्वतीनगर येथील जलकुंभाचे काम स्लॅब लेव्हलपर्यंत आले असून, हे काम पूर्ण करुन घेण्याचे लक्ष्य मनपाने ठेवले आहे. पाणी साठवण्यासाठी जलकुंभ तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष जलवाहिनीतून जलकुंभापर्यंत पाणी आणण्याची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याला सुरुवात केली जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊस