शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४ गावांतील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:44 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.राज्यात दुष्काळाने होरपळलेल्या १५१ तालुक्यातील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. या संदर्भात २५ जानेवारी रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. हे अनुदान दोन टप्प्यात दिले जाणार असून बागायती पिकांसाठी ९ हजार रुपये हप्ता या प्रमाणे दोन टप्प्यात १८ हजार रुपये हेक्टरी अनुदान तर खरीप व रबी पिकांसाठी ३ हजार ४०० रुपये हप्त्याप्रमाणे ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान दोन टप्यात जमा केले आहे. मानवत तालुक्याला २४ कोटी ८१ लाख २० हजार रुपये प्राप्त झाले होते. यामध्ये तालुक्यातील ५३ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता तर ४९ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मात्र मानवत, मंगरुळ बु., वझूर बु., हमदापूर या गावांतील एकूण ४ हजार ३३७ शेतकरी दुसºया हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांचे १ कोटी ३ लाख ६५ हजार ९६४ रुपयांचे अनुदान मागील पाच महिन्यांपासून थकले आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ेलोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. २६ मे रोजी निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंंतर एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत अनुदान वर्ग केले नाही. मानवत शिवारातील १९०२, मंगरूळ बु. १२०४, वझूर बु. येथील ५९६, हमदापूर ६३५ असे एकूण ४ हजार ३३७ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार