शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

परभणी :३१४८ बियाणांचे नमुने ठरले अप्रमाणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:16 IST

शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून योग्य दर्जाचे बियाणे मिळावे, या हेतुने परभणी येथील बीज परिक्षण प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत २०१७-१८ या वर्षात ३१४८ बियाणांचे नमुने अप्रमाणित आढळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून योग्य दर्जाचे बियाणे मिळावे, या हेतुने परभणी येथील बीज परिक्षण प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत २०१७-१८ या वर्षात ३१४८ बियाणांचे नमुने अप्रमाणित आढळले आहेत.शेतकºयांना उपलब्ध होणारे बियाणे योग्य दर्जाचे असणे उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानुसार बियाणांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यात कृषी विभागाच्या वतीने परभणीसह पुणे, नागपूर या तीन ठिकाणी बीज परिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या अधिपत्याखाली अकोला व औरंगाबाद येथेही बीज परिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. विविध कंपन्यांकडून चांगल्या दर्जाचे बियाणे असल्याचे सांगून ते विक्री केले जाते. शेतकरीही या कंपन्यांवर विसंबून राहून बियाणांची पेरणी करतात. परंतु, अनेक वेळा बियाणांची प्रत चांगली नसल्याने त्याचा फटका बसतो. त्यामुळे आर्थिक संकटात सापडण्यापूर्वीच पेरणी करण्यापूर्वी बियाणांची गुणवत्ता तपासण्याची गरज लक्षात घेऊन या प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. अप्रमाणित नमुने आढळल्यानंतर वेळीच सावध होऊन चांगल्या दर्जाचे बियाणे खरेदी करता येते व ते शेतीमध्ये पेरुन चांगले उत्पादन घेता येते. परभणी येथील बीज परिक्षण प्रयोगशाळा पेडगावरोड भागात असून या प्रयोगशाळेत तीन वर्षात ४५ हजार ९७ बियाणांचे नमुने तपासण्यासाठी प्राप्त झाले. त्यापैकी ३५ हजार ९३८ बियाणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ७१७ बियाणांचे नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. यामध्ये गतवर्षी म्हणेच २०१७-१८ या वर्षात या प्रयोगशाळेला १६ हजार ७८३ नमुने प्राप्त झाले. त्यापैकी १५ हजार ८४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३ हजार १४८ नमुने अप्रमाणित ठरले आहेत. २०१६-१७ या वर्षातही या प्रयोगशाळेकडे १४ हजार ३६६ नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १३ हजार २२६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये १ हजार ३५८ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. २०१५-१७ या वर्षातही १३ हजार ९४८ नमुने या प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी आले. त्यापैकी १३ हजार ५८९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ हजार २११ नमुने अप्रमाणित आढळले आहेत.बियाणे जनुकीय तपासणी सुविधापरभणी येथे बीज परिक्षण प्रयोगशाळेत बियाणांची जनुकीय (डीएनए) तपासण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे बियाणांची अनुवंशित शुद्धता तपासणीसाठी लागणारा कालावधी (५० ते १०० दिवस) कमी होऊन चार दिवसांमध्ये तपासणी शक्य होत आहे. याशिवाय बियाणांची भौतिक शुद्धता, उगवण शक्ती, आर्द्रता, ओलावा या बाबींची येथे तपासणी करण्यात येते. एका नमुन्याची तपासणी करण्यासाठी शेतकºयांना ४० रुपयांचे तर महामंडळाला २०० रुपये आणि विविध कंपन्यांसाठी ३०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. शुल्काची रक्कम चलनाद्वारे बँकेमध्ये जमा करावी लागते, असे येथील अधिकाºयांनी सांगितले.आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्रपरभणी येथील प्रयोगशाळेला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. परंतु, मराठवाड्या व्यतिरिक्तही या प्रयोगशाळेत अकोला, जळगाव, बुलढाणा आदी जिल्ह्यांमधूनही शेतकरी बियाणांचे नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेत आणतात व आलेल्या प्रत्येक बियाणांच्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेतून करून दिली जाते, असे येथील अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.परभणीच्या प्रयोगशाळेला आयएसओपरभणी येथे उच्चदर्जाची बीज परिक्षण प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेला २०१५ मध्ये आयएसओ नामांकन मिळाले होते. आता पुन्हा एकदा नामांकनासाठी या प्रयोगाशाळेचे लेखापरिक्षण दोन महिन्यापूर्वी करण्यात आले आहे. बीज परिक्षण अधिकारी प्रियंका भोसले, कृषी अधिकारी एम.टी.उन्हाळे, बी.डी.पडोळे, आर.डी. बर्वे, कृषी पर्यवेक्षक पी.एम.सुवर्णकार, लिपीक एल.बी. शिंदे यांच्या प्रयत्नातून यावेळीही प्रयोगशाळेला निश्चित आयएसओ मिळेल, असा विश्वास येथील अधिकारी व कर्मचाºयांना वाटत आहे. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेला अतीशय प्रतिष्ठेचा दिल्ली येथील डी.एल.शहा अ‍ॅवॉर्ड यापूर्वी मिळालेला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी