शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परभणी : अवैध वाळू वाहतुकीचे चौदा ट्रक ताब्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:27 IST

अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घेतले़ या ट्रकमध्ये ५६ ब्रास वाळू असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे़ या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाºयांमध्ये जरब बसली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घेतले़ या ट्रकमध्ये ५६ ब्रास वाळू असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे़ या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाºयांमध्ये जरब बसली आहे़पाथरी, गंगाखेड, पालम हा भाग गोदावरी नदीच्या परिसरातील आहे़ गोदावरी घाटावरील अनेक वाळू धक्के लिलावामध्ये सुटले आहेत़ लिलावाच्या नियमांचे उल्लंघन करीत दिवसरात्र वाळू उपसा सुरू असल्याने मागील काही महिन्यांपासून महसूल प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ सोनपेठ तालुक्यातील लासिना येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला आहे़ मात्र या धक्क्यावरून रात्री-बेरात्री अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू होता़ लासीना भागातून येणारी वाहने थेट पाथरी तालुक्यातील विटा मार्गे निघून जात असत़ सातत्याने वाहनांची वाहतूक होत असल्याने विटा येथील ग्रामस्थांनी १३ एप्रिल रोजी वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर नजर ठेवली़ रात्री ११ वाजेच्या सुमारास लासिना वाळू घाटातून येणारी वाहने थेट पाथरी तालुक्यातील मुदगल-विटा रस्त्याने जात होती़ येथील ग्रामस्थांनी तहसीलदार वासुदेव शिंदे यांना मोबाईलवरून ही माहिती दिली़ त्यानंतर तहसीलदार शिंदे यांच्यासह तलाठी आरक़े़ कोल्हे, बिडवे, चिपटे, पोलीस निरीक्षक व्ही़व्ही़ श्रीमनवार हे १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी १४ हायवा ट्रक पथकाने ताब्यात घेतले़अंधाराचा फायदा घेऊन काही वाहन चालकांनी वाहने घेऊन पोबारा केला़ दरम्यान, १४ एप्रिल रोजी सकाळी उपजिल्हाधिकारी सी़एस़ कोकणी आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़सर्व वाहनांमध्ये अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.कारवाईची प्रक्रिया सुरूविटा येथे पकडलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांसंदर्भात उपजिल्हाधिकारी सी़ एस़ कोकणी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, या वाहनांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत़ पुढील कारवाई सुरू आहे. त्यामुळे या वाहनांवर दंडात्मक कारवाई होते की, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जातो, याबाबत मात्र उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही़पाथरी तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाळूचे साठा प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे़ क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा केला जात आहे़ दोन महिन्यांपूर्वीच एका प्रकरणात महसूल प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई केली होती़ त्यानंतर आता तब्बल १४ वाहने मध्यरात्री पकडल्याने अवैध वाळू उपशाची गती किती मोठी आहे हे दिसून येत आहे़या वाहनांवर केली कारवाईविटा येथे अवैध वाळू वाहतूक करताना १४ हायवा ट्रक पकडण्यात आले आहेत़ या ट्रकचा पंचनामाही पूर्ण झाला असून, पंचनाम्यातील उपलब्ध माहितीनुसार एमएच ४४/९५३१ (चार ब्रास), एमएच २० बीटी-३१०७ (४ ब्रास), एमएच ४३ ई- ७११४ (४ ब्रास), एमएच ४२ टी-००९६ (४ ब्रास), एमएच ०६ एक्यू-६५९१ (४ ब्रास), एमएच ४५ टी-६८६३ (४ ब्रास), एमएच ४४ यू-५७७७ (४ ब्रास), एमएच ३२ डी- ९६८० (४ ब्रास), एमएच १३ एएक्स-४१०३ (४ ब्रास), एमएच ४४/ ११९२ (४ ब्रास), टीएन ८७-टीएमपी-७७०८ (४ ब्रास), एमएच ०६ एक्यू-६१३४ (४ ब्रास), एमएच १२ आयएफ -८८९९ (४ ब्रास),एमएच १२ एफयू- ६७०७ (४ ब्रास) या वाहनावर कारवाई करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूTahasildarतहसीलदार