शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani ZP Result 2026: मतमोजणीला सुरुवात; टाकळी कुंभकर्णमध्ये उद्धवसेनेची आघाडी, पिंगळीत शिंदेसेना पुढे

By मारोती जुंबडे | Updated: February 9, 2026 11:22 IST

पंचायत समिती गणांमध्येही मतमोजणी वेगाने सुरू असून प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीत चढ-उतार होत आहेत.

मारोती जुंबडे परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सुरुवात झाली. एकूण ४० टेबलांवर सात फेऱ्यांत मतमोजणी होत असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटात उद्धव सेनेच्या प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपच्या अश्विनी संदीप देशमुख यांच्याशी त्यांची थेट लढत असून दोन्ही गटांत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या काही फेऱ्यांनंतर उद्धव सेनेला अनुकूल कल दिसत असल्याने परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.

दरम्यान, पिंगळी जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेच्या पूजा अनिल सावंत या आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महानंदा मुंजा गुरव व भाजपच्या स्नेहा प्रदीप पाटील वाघीकर यांच्यातही चुरस असली तरी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शिंदे सेनेने आघाडी घेतली आहे.पंचायत समिती गणांमध्येही मतमोजणी वेगाने सुरू असून प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी वाढत असून पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.एकूण सात फेऱ्यांनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धाकधूक कायम आहे. पुढील फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani ZP Election Result 2026: Counting Begins, Shiv Sena Leads

Web Summary : Parbhani Zilla Parishad election counting underway. Shiv Sena (Uddhav) leads in Takli Kumbhakarna, while Shiv Sena (Shinde) leads in Pingli. Tight contests reported, final results awaited after seven rounds.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५parabhaniपरभणी