शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या २२ व्या वर्षी उद्धवसेनेच्या प्रतीक्षा जयस्वालांची परभणी जिल्हा परिषदेमध्ये एन्ट्री! भाजपचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:28 IST

Parabhani ZP Election Result 2026: तरुणाईची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री! प्रतीक्षा जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराला पाजलं पराभवाचं पाणी.

- मारोती जुमडे

परभणी: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत परभणीकरांनी यंदा घराणेशाहीपेक्षा युवा नेतृत्वाला अधिक पसंती दिली आहे. टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटातून उद्धवसेनेच्या युवा उमेदवार प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. अवघ्या २२ व्या वर्षी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाऊल ठेवणारी प्रतीक्षा ही जिल्ह्याच्या राजकारणातील नवा आणि सर्वात तरुण चेहरा ठरली आहे.

विजयी आकडेवारी आणि चुरस टाकळी कुंभकर्ण गटात दुसऱ्या फेरीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. प्रतीक्षा जयस्वाल यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. त्यांना एकूण ३,४१३ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या अश्विनी देशमुख यांना २,६२९ मते पडली. जयस्वाल यांनी ७८४ मतांच्या फरकाने भाजपला पराभवाचा धक्का दिला आहे.

पंचायत समिती गणातही उद्धवसेनेची सरशी जिल्हा परिषदेसोबतच याच सर्कलच्या पंचायत समिती गणातही उद्धवसेनेने बाजी मारली आहे. तानाजी भाऊराव कदम यांनी १,६८५ मते मिळवून मंचक सामाले (१,४०० मते) यांचा २८५ मतांनी पराभव केला. तर नांदापूर पंचायत समिती गणात विवेक बाळासाहेब रसाळ यांनी चुरशीच्या लढतीत २६२ मतांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.

प्रतीक्षाचे सर्वत्र कौतुक!या दुहेरी विजयामुळे टाकळी कुंभकर्ण परिसरात उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. एका २२ वर्षांच्या तरुणीने दाखवलेल्या या धाडसामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 22-Year-Old Pratiksha Jaiswal Enters Parbhani Zilla Parishad, Uddhav Sena Victory!

Web Summary : Pratiksha Jaiswal, 22, of Uddhav Sena, won the Takli Kumbhakarna Zilla Parishad seat, defeating BJP. Uddhav Sena also won in Panchayat Samiti. Her youth leadership is celebrated.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६parabhaniपरभणीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५BJPभाजपा